जाती,धर्माभिमुख नव्हे तर जनताभिमुख चळवळीची गरज राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष-प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या खरशिंग (तालुका कवठेमंकाळ) येथील नामफलकाचे अनावरण प्रसंगी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, नयना लोंढे, स्वाती सौंदडे ,लखन वायदंडे, श्रीमंत कांबळे इत्यादी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
खरशिंग- (ता.कवठेमहंकाळ) बदलत्या सामाजिक समीकरणांमध्ये राजकीय समीकरणांचा आराखडा दडलेला असतो त्यातच बरेचदा पुरोगामी विचारांच्या संघटना या जाती आणि धर्माच्या चौकटीतच मर्यादित राहिल्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि ते खूप उशिरा कळतं याचा पूर्ण विचार करून पुरोगामी संघर्ष परिषदेने सर्वच जातींना संघटनेत सामावून घेऊन धर्माचे बांध हीओलांडले आहेत.

त्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषद ही जनताभिमुख असल्याने सर्व जाती-धर्मांचा ओढा संघटनेकडे असल्याचे मत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी व्यक्त केले ते खरशिंग (तालुका कवठेमंकाळ) या ठिकाणी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कु. नयना लोंढे यांनी केले. यावेळी कर्नाटक राज्याच्या प्रदेश अध्यक्षा सौ. सविता बनसोडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे, पश्चिम महाराष्ट्राचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल बनसोडे ,प्रा.भास्कर खिलारे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख लखन वायदंडे,वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकारणी सदस्य विजय सौंदडे, सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत कांबळे, कवठेमंकाळ तालुक्याचे अध्यक्ष किशोर कांबळे, सांगली युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, सांगली जिल्ह्याच्या संघटिका नंदिनी वाघमारे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष अतुल वाघमारे, आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष सागर लांडगे, वैभव पाटील, करण लोंढे,गुरु लोंढे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार मेजर हरीराम लोंढे यांनी मानले.





