ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याचा तपास करण्याची दुरुस्ती करणारा आदेश रद्द करा पुरोगामी संघर्ष परिषदेची मिरज प्रांताधिकार्याकडे मागणी
डी. वाय. एस. पी. व तत्सम अधिकाऱ्यांनीच तरतुदीनुसार तपास करावा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिरज:- ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्याचा तपास डी. वाय. एस. पी. व त्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची तरतूद 1989 मध्ये खाली असताना आता नव्याने दुरुस्ती करून ए.पी. आय. व तत्सम अधिकारी यांना दिला असल्यामुळे तशा आशयाचे पत्र पुरोगामी संघर्ष परिषदेच्या हाती लागले असल्याने या दुरुस्तीला पुरोगामी संघर्ष परिषदेचा तीव्र असून आशा अधिकाऱ्यांनी जर तपास केला तर त्याच्यामध्ये विश्वासार्हता न राहता मागासवर्गीय यांच्यावर अन्याय अत्याचारच होतील त्यामुळे कायद्यात झालेली दुरुस्ती ताबडतोब रद्द करण्याचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिरजेचे प्रांताधिकारी नारायण मोरे यांना देण्यात आले.
सदर शिष्टमंडळात पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे ,राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत कांबळे, जिल्हा युवकचे अध्यक्ष अक्षय खुडे,सांगली जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, जिल्हा संघटिका नंदिनी वाघमारे, महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सुजाता कांबळे, मिरज तालुक्याचे अध्यक्ष भास्कर खिलारे ,खंडू भंडारे, विजय सौंदडे इत्यादी पदाधिकारी होते.