परिचारक गटा विरोधात सर्वपक्षाची एकच आघाडी करुन परिचारक गट संपुष्टात आणणार-मनसे नेते दिलीप धोत्रे
दुसरी आघाडी करुनच लढणार "ब" टिम संबोधणे हा खोडसाळपणा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-पंढरपुर मतदार संघात जनताच परिचारक गटाविरोधात विरोधी पक्ष म्हणुन कार्य करते.तिला एकच नेता असला पाहीजे असे नाही.त्यामुळे सर्व विरोधी पक्ष,संघटना,व्यक्ती यांना एकत्र करुन येत्या नगरपालिका निवडणूकीत परिचारक गट संपुष्टात आणणार असल्याचे आव्हान मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
जे जे परिचारकांना विरोध करत असतील त्यासर्वाना सोबत घेऊन सामुहिक नेतृत्वाद्वारे येणारी निवडणुक आम्ही लढविणार असुन यात आमचाच विजय निश्चिंत होणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली .आम्हाला “बि” टीम घोषीत करुन काही लोकांमार्फत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळपणाचे काम काही लोकांनी सुरु केले.पण जनता हुशार आहे.गेली चाळीस वर्ष परिचारक गटा कडे सत्ता असुन त्यांनी जनहिताची कोणतीच कामे केली नाहित .निव्वळ निष्क्रिय असणार्या या गटाला जनता कंटाळली असुन येत्या निवडणूकीत १००%बदल निश्चीत होणार असा विश्वास दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.
यापुढे संभ्रमीत वातावरण केले जाणार असुन विरोधी शक्तीत फुट पाडण्याचा प्रयत्न होणार आहे जनतेने सावध राहिले पाहिजे व माध्यमानीही सत्य जनतेसमोर आणावे असे आवहान केले.
या पत्रकार परिषदेसाठी अरुणभाऊ कोळी ,मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे,जयवंत भोसले,शशिकांत पाटील,संजय बंदपट्टे,महेश पवार आदी उपस्थित होते.