बीसेफ प्रणित अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद लातूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश हणमंते तर विभागीय अध्यक्ष पदी इंजि. नागनाथ कलवले यांची निवड
इतर पदाधिकार्यांच्या निवडी जाहिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
लातुर:-..16/01/22 जानेवारी 2022 वार रविवार लातूर येथे अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांची बैठक प्रा.राजेंद्र सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.संजयकुमार मांजरमकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.हि बैठक शहर जिल्हा शाखा गठण करुन, पाचवे राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठीच्या नियोजनासाठी आयोजित केली होती.
यावेळी बीसेफ प्रणित अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद लातूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश हणमंते तर विभागीय अध्यक्ष पदी लातूर म.पा.चे इंजि. नागनाथ कलवले यांची निवड करण्यात आली. सदर बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती.रंजना चव्हाण,बाबुराव गायकवाड,नांदेड जिल्हा सचिव,प्राचार्य पंढरी कोतेवार नायगाव ता.अध्यक्ष.प्राचार्य सुर्यवंशी सर नायगाव ता.सचीव.अड माणिकराव पवार नंदू राऊत प्रा राजेंद्र लोदगेकर.,यादव नवारे हे उपस्थित होते.
यावेळी प्रा.राजेंद्र सुर्यवंशी, राज्यउपाध्यक्ष.इंजि.नागनाथ कलवले,मराठवाडा विभागीयअध्यक्ष.रमेश हणमंते लातुर जिल्हाध्यक्ष,प्रा.रावसाहेब समुखराव,जिल्हा महासचिव प्रा.चंद्रकांत मोरे लातूर जिल्हाउपाध्यक्ष डॉ बालाजी समुखराव जिल्हा उपाध्यक्ष,केंद्र प्रमुख कवी बालाजी कोळी, जिल्हा संघटक,प्रवीण वलांडे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख,उद्धव दुवे,चाकुर तालुकाध्यक्ष अंगद कांबळे, लातुर तालुकाध्यक्ष तानाजी जगताप लातुर तालुका सचिव,प्रा.सुरेश समुखराव लातुर शहराध्यक्ष,प्रा.माधव वाघमारे ,जळकोट तालुकाध्यक्ष अँड गायकवाड जळकोट तालुका महासचिव अशी निवड करुन अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा.संजयकुमार मांजरमकर व राज्यकार्याध्यक्ष मा.व्यंकट दंतराव यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पाचव्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी व्यंकट दंतराव तर संयोजक पदी जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना चव्हाण मॅडम,साहित्य परिषदेचे संजय मांजरमकर,नेट सेट प्राध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.राजेंद्र सुर्यवंशी मनपा लातुरचे साहित्यिक अभियंता नागनाथ कलवले, जिल्हाध्यक्ष रमेश हणमंते,महासचिव प्रा .रावसाहेब समुखराव,यांची निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.तत्पुर्वी राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,मुक्ता साळवे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व ज्ञानाचा प्रतिकात्मक दिपप्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात व्यंकट दंतराव यांनी संघटनेचे ध्येय धोरणे सांगुन संघटनेचे वाटचाल विषद केली.सुत्रसंचलन तानाजी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन लहु हणमंते यांनी मानले.कार्यक्रमास कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्य शहराध्यक्षा आशाताई सुर्यवंशी, शांतिदुत अर्बन निधी बॅंकेच्या चेयरमन सागरबाई मोहिते, बीटरगांवचे सरपंच नंदु राऊत, अशोक शेळके,संग्राम गवाले, गवळी यांची उपस्थिती होती.
या निवड झालेल्या सर्वांचे समाजाच्या विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे