तमाशाचे कार्यक्रम करायचे कसे पुरोगामी संघर्ष परिषदेचा सवाल
प्रजासत्ताकदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावणी आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- शासन एका बाजूला जत्रा करायला बंदी आणून दुसऱ्या बाजूला संस्कृती कार्यक्रमाला परवानगी देत असेल तर आई भीक मागू देईना आणि बाप जेऊ देईना ही वाईट अवस्था महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांची झाली असल्यामुळे येत्या 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयावर पुरोगामी संघर्ष परिषद तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यासाठी लावणी आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महासचिव.मारुतीराव बोभाटे व राज्याचे कार्याध्यक्ष नितीभाऊ तुपे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना आज दिलेल्या निवेदनात दिला आहे.निवेदनात पुढील मागण्या करण्यात आले आहेत तमाशा कलावंत याच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, तमाशा कलावंतांच्या मुलांना शासकीय नोकरीत तीन टक्के आरक्षण मिळावं व तमाशा कलावंतांना शासकीय विश्रामगृहावर मुक्काम परवानगी व एसटी बस पास मोफत मिळावा.
अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे तमाशा कलावंत आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज रोकडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीपाली पाटणकर,सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सचिन भिसे, जिल्हा संघटक शब्बीर शेख, कोरेगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय लेंबे, रमेश कांबळे, सिराज मुलाणी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.