पत्रकार भैरवनाथ कडाळे यांचे निधन.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर येथील पत्रकार भैरवनाथ कडाळे यांचे कोरोनामुळे सोमवारी मुंबई येथे उपचार दरम्यान निधन झाले.
भैरवनाथ भानुदास कडाळे हे पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील रहिवासी आहेत.
त्यांच्या पाश्यात्य पत्नी, दोन मुली,जावई, एक मुलगा असा परिवार आहे.
दहा दिवसापुर्वी त्याचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्याच्यावर पंढरपूर येथील हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू होते.दरम्यान प्रकृती खालावल्याने दोन दिवसापूर्वी मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले.
पत्रकार भैरवनाथ कडाळे हे २० वर्षांपासून पंढरपूर येथील वृत्तपत्र तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम केले आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून पंढरपुरातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.