Uncategorized

सामाजिक प्रबोधना मध्ये कलावंतांचे योगदान मोलाचं — मारुती बोभाटे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कलावंत आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी दीपाली पाटणकर यांना नियुक्तीचे पत्र देताना प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे, प्रदेश कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, सुरज रोकडे व इतर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सातारा :- सामाजिक प्रबोधन करून चळवळ जर तळागाळापर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यामध्ये कलावंतांचे योगदान हे सक्रिय आणि मोलाचं असतं असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश महासचिव मारुतीराव भाटे यांनी केले ते सातारा या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कलावंत आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी दीपाली पाटणकर यांची नियुक्ती करून सत्कार करताना बोलत होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय नितीनभाऊ तुपे, अश्विनी पाटणकर, गोपाल पाटणकर, रुपाली मोरे, संगीता पाटणकर, किरण पाटणकर , सुरज रोकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार गोपाल पाटणकर यांनी मानले.

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सातारा जिल्हा कलावंत आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज रोकडे यांना निवडीचे पत्र देताना प्रदेश कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे, दीपाली पाटणकर इत्यादी

कलावंतांच्या न्यायहक्कासाठी लढा उभारणार– नितीनभाऊ तुपे

*सातारा*:- आपल्या कलागुणांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जनतेची सेवा करीत असताना सामाजिक प्रबोधनकरून संपूर्ण जीवन झिजविणाऱ्या कलावंतांची जर उपेक्षा होत असेल तर यापुढे पुरोगामी संघर्ष परिषद कलावंतांच्या न्याय हक्कासाठी टोकाचा लढा उभारून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली टोकाचा लढा देऊन सक्रिय राहील असे आश्वासन पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय नितीन भाऊ तुपे यांनी दिले ते सातारा या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कलावंत आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सुरज रोकडे यांचे निवडी प्रसंगी बोलत होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश महासचिव माननीय मारुतीराव बोभाटे दीपाली पाटणकर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close