Uncategorized

सामाजिक चळवळीची दिशा बदलून सत्तेत जाणारी फळी तयार करणार— प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात व्यक्त केली भावना

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सातारा– पारंपारिक आंदोलनाला फाटा देत सामाजिक चळवळीची दिशा बदलत असताना ,सामाजिक संघटनेमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी देऊन चळवळ चालवत असताना हात पसरून हात खाली करून मागण्यापेक्षा हात वर करुन देणारे होण्यासाठी ज्यांच्यामध्ये राजकीय अंग आहे अशा कार्यकर्त्यांची सत्तेत जाणारी मजबूत फळी तयार करणार असल्याची पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी घोषणा केली. ते सातारा या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात बोलत होते.


प्रा वायदंडे बोलताना पुढे म्हणाले एक वर्षाच्या कालावधीमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेनं चळवळीची पूर्णपणे दिशा बदलत असताना सामान्य कार्यकर्त्याला नेता बनवून महिलांची फक्त घोषणा केली नाही तर जास्तीत जास्त संधी देऊन महिलांची चळवळ उभी केली आहे. संघटनेची जेवढी जेवढी आंदोलने झाली त्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग सक्रिय आहे.*
*पुरोगामी संघर्ष परिषद सामाजिक चळवळीचं भान असलेली वादळ रुपी संघटना असून आम्ही या चळवळीमध्ये नागरिकांना कार्यकर्ता व कार्यकर्त्याचा नेता बनवण्याची मशीनच निर्माण केली आहे.*
*सदर मेळाव्यात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे संस्थापक कार्याध्यक्ष नितीन भाऊ तुपे संस्थापक महासचिव मारुतीराव बोभाटे राज्याचे मुख्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सौ स्वाती सौंदडे पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस सौ छाया मोरे सांगली जिल्हा अध्यक्ष कुमारी नयना लोंढे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संजय साठे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष खंडू कांबळे आदींची भाषणे झाली.
सदर मेळाव्यास कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ सविता बनसोडे ,पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख श्रीमती शोभा पारधे, पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा वनिता जाधव, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे ,पश्चिम महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष अंकुश भोंडे, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख लखान वायदंडे, बँड बँजो आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल बनसोडे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा ज्योती साठे, सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा, सौ.ज्योती अवघडे, सातारा जिल्हा अध्यक्षा सौ. सीमा साळुंखे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषराव साळुंखे, नेताजी अवघडे,सांगली जिल्ह्याचे युवकचे जिल्हाअध्यक्ष अक्षय खुडे, सातारा जिल्हा सरचिटणीस अधिकराव चव्हाण, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, तानाजी खिल्लारे ,अण्णा फाळके, शंकरराव चव्हाण, भास्कर खिलारे, आकाश नेटके ,राहुल घोलप, कोल्हापूरपूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चौगुले ,सांगली जिल्हा संपर्कप्रमुख अमर शिंदे ,सुजाता कांबळे, नंदिनी वाघमारे, शरयू खिलारे, सुकेशनी साठे, पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा कविता कांबळे, भिकाजी वाघमारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close