पंढरीतील रुग्णांच्या सेवेचे ठायी तत्पर डॉ.अजित आणि डॉ.सुजित जाधव बंधू सत्वर
जाधव हॉस्पिटल वर्धापन दिनानिमित्त प्रा.अशोक लोखंडे-पाटील परिवाराच्या शुभेच्छा!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये सेवेचा वसा आणि वारसा घेऊन निष्ठा आणि कर्तृत्वाच्या संगतीने अश्वारुढ होऊन वैद्यकीय सेवा क्षेत्र पादाक्रांत करण्यासाठी निघालेल्या डॉ.अजित आणि डॉ.सुजित यांना 26 जानेवारी 2020 रोजी लावलेल्या जाधव क्लिनिक या छोट्याशा रोपट्याचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर होत आहे त्यानिमित्त दोघांना ही वर्धापन दिनाच्या हार्दिक आभाळभर शुभेच्छा.
खरं तर ज्यांच्या म्हणजे दोघांच्या ही नावात जय,विजय आणि जिंकणे आहे असे अजित व सुजित ही दोन रत्ने पळशी गावाला एक अनमोल वैभव प्राप्त करून देणारी व्यक्तिमत्त्वआहेत.जिद्द,निश्चय आणि हिम्मत अंगी बाळगून कष्टाच्या जोडीने सातत्य ठेऊन ध्येयपूर्तीसाठी झगडणारे व्यक्तीच यशाची शिखरे गाठू शकतात आणि तेच या दोघांनी करून दाखवले आहे.आजोबा आदरणीय हरिबा अप्पा यांच्या उपदेशानुसार दीन,दुःखी ,गरीब लोकांना मदत व सहकार्य करण्याचे काम करणे हा ठेवाच जणू या दोघांनी जतन केलेला दिसून येतो.जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ,
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा
या उक्तीप्रमाणे आपल्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा ही आपुलकी आणि जिव्हाळ्याने केली जाते जेणे करून रुग्ण 100% आपण आलेले ठिकाण हे मंदिर आहे याचा प्रत्यय येत असलेला दिसून येतो.हे सर्व रुग्णांच्या येत असलेल्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे.
आपणास जे क्षेत्र आवडेल तिकडेच आपण आपल करिअर करावं या विचाराचे शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी वडील नामदेव नाना यांच्या जडण घडणीत, भाळवणी जि.प. गट आणि पंचक्रोशित आपल्या न्याय व निष्ठा यासाठी जनमानसात दबदबा निर्माण केलेले स. शि. वसंतराव काळे सह.साखर कारखाना संचालक असलेले मोठे चुलते गोरख भाऊ यांचे साथीने तर शिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवून महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मुलासाठी शिक्षणाची दारे खुली करणारे मामासाहेब शिक्षणमहर्षी प्राचार्य सुखदेवराव चव्हाण सर यांचे मार्गदर्शनाखाली व पळशी गावचे युवा नेते .सरपंच बंधू अर्जुन बापू यांचे सहकार्याने डॉ.जाधव बंधू आपले वैद्यकीय क्षेत्रातील स्थान अढळ करीत असलेले पहावयास मिळतात.
आज प्रत्येक महिना दोन महिन्यात आपले हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत सर्व रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते.गरजू व गरीब रुग्णांना विविध प्रकारच्या आरोग्य योजनाच्या माध्यमातून उपचार पद्धती सुरू झाली आहे.अद्ययावत ऑपरेशन थिएटर,अतिदक्षता विभाग, लॅबोरेटरी,मेडिकल स्टोअर्स आणि तज्ञ डॉक्टर्स सुसज्ज स्टाफ अशा सर्व सोईनी युक्त हॉस्पिटल जाधव हॉस्पिटल लवकरच मल्टी हॉस्पिटल होण्याच्या मार्गावर आहे.
अशा सुसंपन्न जाधव हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त पुनश्च एकदा शुभेच्छा देतो त्यांचे हे लोकसेवेचे कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
शुभेच्छुक: प्रा.अशोक लोखंडे-पाटील



