लस न घेतलेल्या व दुकानात मास्क चा वापर न करणाऱ्या आस्थापना सील करणार –मुख्याधिकारी अरविंद माळी
पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने वारंवार सूचना देऊन ही नागरिकांनी लसीकरण न केल्याने व मास्क चा वापर करीत नसल्याने शहरातील व्यापाऱ्या वर केली दंडात्मक कारवाई
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्ट
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-शहरातील नागरिकांचे लसीकरण कमी प्रमाणात असल्यामुळे शहरामधील व्यापारी आस्थापनांमधील दुकान मालक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे लसीकरणाच्या प्रमाणपत्राची नगरपालिकेचे अधिकाऱ्यांमार्फत तपासण्यात करण्यात आली. या तपासणी च्या वेळी मास्क न घातलेल्या व लसीकरण न घेतलेल्या व्यापारी व नागरिकांना तसेच त्यांच्याकडे खरेदी साठी आलेल्या ग्राहकांवर नगर परिषदेच्या तपासणी पथकाने दंडात्मक कारवाई केली नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी येणाऱ्या कोरोना च्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेण्याबाबत नगर पालिके मार्फत वारंवार आवाहन करून ही नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने नगरपालिकेवर दंडात्मक कारवाई करण्याची पाळी आलेली आहे. आज केलेल्या कारवाईत आठ हजार चा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आला.
या कारवाईच्या वेळेस नगरपालिकेचे उमेश कोटगिरी,श्री चेतन चव्हाण,श्री दर्शन वेळापूरे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सहभागी झाले होते. तरी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी पहिला व दुसरा लसीकरण चा डोस पूर्ण करून घ्यावा, दोन्ही डोस पूर्ण असलेल्या ग्राहकांना सेवा द्यावी अन्यथा नगरपालिकेंमार्फत आस्थापना सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिला आहे .