उपजिल्हा रुग्णालयाने आयोजिलेल्या स्पर्धेत स्वेरी प्रथम
जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
छायाचित्र- उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर तर्फे आयोजिलेल्या व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेले स्वेरी महाविद्यालयाचे विद्यार्थी सोबत रुग्णालयाचे अधिकारी व प्राध्यापक वर्ग
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
एच. आय. व्ही. / एड्स, टि. बी. जनजागृती शॉर्ट व्हिडीओ स्पर्धेत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ‘जागतिक एड्स दिन पंधरवडा’ निमित्त व न्यू इंडियाच्या अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती उपक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयीन युवक-युवतींकरीता एच. आय. व्ही./ एड्स, क्षयरोग, रक्तदान या विषयांवर पोस्टर स्पर्धा व शॉर्ट व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व फार्मसी महाविद्यालयाने बाजी मारली.
प्रारंभी परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टच्या विहान प्रकल्पाच्या माध्यमातून गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच एच.आय.व्ही. संक्रमण रोखण्याचा संकल्प करण्याकरीता कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ‘रेड रिबन’चे बोधचिन्ह व २०२१ या वर्षाचे घोषवाक्य अधिक आकर्षित होत होते. यात शेवट असमानतेचा, शेवट एड्सचा, शेवट संसर्गित रोगाचा अशी विविध घोषवाक्ये, रांगोळी आणि पोस्टरद्वारे साकारली. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपुरला ‘शॉर्ट व्हिडिओ मेकिंग’ मध्ये प्रथम क्रमांकाचे रोख रु. पाच हजाराचे बक्षीस अक्षय माने, नितिन एकमल्ली, इरफान मुलाणी, निहाल मुजावर, मदन पाटील व रोहित खंडागळे यांनी पटकावले. रु. तीन हजारचे दुसरे बक्षीस विभागून स्वेरी फार्मसीचे प्रतिक जाधव व ग्रुप तसेच अहमद नदाफ यांना विभागून मिळाले तर स्वेरीच्याच आरती बंडगर, ज्ञानेश्वरी दास, ऐश्वर्या पाटणे, अश्विनी मोरे व अन्वी जाधव यांना रु. दोन हजाराचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी गायकवाड यांनी केले.
यावेळी त्यांनी आय.सी. टी. सी. /एआरटी च्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा सादर केला. या सेंटरच्या माध्यमातून संसर्गितांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, सीडी-फोर चाचणी, वायरल लोड चाचणी आदी महागड्या चाचण्या मोफत केल्या जातात. अध्यक्षीय भाषणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम म्हणाले कि, ‘कोरोनाच्या जागतिक महामारीच्या कालावधीत एच.आय.व्ही संसर्गितास वेळेवर औषध उपचार व त्यांचे कोरोना लसीकरण यशस्वीपणे राबवित आहे तसेच कोणताही भेदभाव न करता चाचण्या, औषधोपचार तसेच संसर्गित गरोदर मातांना प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर मोफत सेवा दिल्या जातात.’ जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी ‘सोलापूर जिल्ह्यातील संसर्गित आकडेवारी सादर करून त्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शासकीय सुविधा, विविध योजना, एक खिडकी योजना व इतर सवलती यांची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नागेश देवकर, संतोष शेंडगे, दिपक गोरे, एजाज बागवान, योगीराज विजापुरे, युवराज वांगी, संदीप देशमुख, बाळासाहेब पांढरे, श्रीमती मीनाक्षी कदम, स्वाती कसबे, रूपाली देवकर, सुज्ञाता गायकवाड, वैशाली वाघमारे, सुरेखा साठे, तुकाराम साठे, भारत सोनवणे, श्रीमती राजश्री टकले यांनी विशेष परिश्रम घेतले. संसर्गित रुग्णांच्या बाबत भेदभाव न करणे व समानतेची वागणूक देण्यात यावी यासाठी सर्वांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल ऑफिसर डॉ. अरविंद गिराम, के. बी. पी. कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.लतिका बागल, स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, डॉ.दत्तात्रय काळेल, डॉ.दत्तात्रय चौधरी, प्रा. टी. एस. जोशी, प्रा. यशपाल खेडकर, ए.आर.टी विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. आशा घोडके, डॉ.संभाजी भोसले, डॉ. अविनाश वुईके, डॉ. विनिता कार्यकर्ते, श्रीमती सिंधू लवटे, सहाय्यक रेखा ओंबासे, लतिका उराडे, मनीषा कुलकर्णी, मंगल कर्चे, रेवती नाडगौडा, अनुराधा वाघमारे हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी तर बाजीराव नामदे यांनी आभार मानले.