पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी ना.दत्तात्रय भरणे यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने भव्य सत्कार
पंढरपुर:-सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी सलग सहाव्या बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या निवासस्थानी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने भव्य सत्कार पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक डि राज सर्वगोड यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आला… यावेळी सत्कार करताना सोलापूर महानगरपालीकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यशवंत सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे गटनेते सोलापूर महानगरपालिका किसन जाधव ,आदम बागवान, संतोष जाधव व असंख्य कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.. व यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक डि राज सर्वगोड यांच्या कामाचे कौतुक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले . नगरसेवक डि राज सर्वगोड यांच्या मातोश्री समाजसेविका सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी सिताराम सर्वगोड यांच्या अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.