पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मातंग समाजासाठी विविध मागण्यांचे निवेदन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे याना निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.स्वाती सौंदडे,जिल्हाध्यक्षा कु.नयना लोंढे,मयूरी कांबळे इ.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:-बुधवार दि.11आँगस्ट पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.स्वाती सौंदडे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मातंगसमाजाचा विकास होण्यासाठी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे याना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळाचा विचार करता मातंग समाजातील महीलांना लोकशाहीर अण्णा भाऊसाठे आर्थिक विकास महामंडळाकडून ५०हजार रू.चे मायक्रो कर्ज विनाविलंब,विनाव्याज,विनाजामीनदार,विना व्याज द्यावे. महामंडळाचे सर्व कर्ज माफ करावे.महामंडळाचे कर्ज नाकारनाऱ्या राष्ट्रीय बंँकेच्या शाखाधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करा.लहूजी साळवे मातंग आभ्यास आयोग नविन गठन न करता याच शिफारशी पुरवणी आभ्यास करून लागू करा.
सदर शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्षा कु.नयना लोंढे ,युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे,मिरज तालुकाध्यक्ष दिपक गांजागोळ, मिरज तालुका महीलाआघाडी अध्यक्षा मयूरी कांबळे,सुजाता कांबळे,दादासो कांबळे,विजय सौंदडे इ.पदाधिकारी होते.


