दलित स्वयंसेवक संघाच्या संघ प्रमुखपदी विजयकुमार पोटफोडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापूर: महाराष्ट्र मध्ये दलित स्वयंसेवक संघाने समाज परिवर्तनाच्या कार्याची चळवळ जनसामान्यापर्यंत पोहोचून अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. अशा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या दलित स्वयंसेवक संघाच्या संघ प्रमुखपदी, महाराष्ट्र राज्य. सोलापूर येथील विजयकुमार पोटफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयकुमार पोटफोडे हे दलित स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून निष्ठेने कार्य करीत आहेत. सामाजिक वाईट चालीरीती आणि अंधश्रद्धा याला कडाडून त्यांनी विरोध केला आहे तसेच शैक्षणिक चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची निवड महाराष्ट्र राज्याच्या दलित स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदी करून चळवळीला बळकटी देण्याचा उद्देश कार्यकारिणीने व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र पुणे येथील दलित स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयात देण्यात आले. यावेळी सोपान चव्हाण प्रदेशाध्यक्ष दादासाहेब सोनवणे, राजाभाऊ धडे, जनार्दन पेटाडे, प्रभाकर पारधे, संजय केंदळे, विजय रणदिवे, दत्ता अडसूळ, राजा कसबे, बिहार जाधव, मारुती पाटोळे, हनुमंत पवार, देविदास पारधे, प्रभाकर वैराळ, संजय केंदले, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता अडसूळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद अस्टूळ, राजाभाऊ कसबे, दिनेश माने, बाळू जाधव, श्रीधर कांबळे, रणधीर लोंढे, सीताराम साबळे, बाळू साबळे, बापूसाहेब मोरे,अँड. शैलेश पोटफोडे, बालाजी घोडके आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.