
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-आज DVP लायब्ररीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर , संभाजी ब्रिगेडचे. अमरजीतजी पाटील, मनसे नेते दिलिपबापू धोत्रे यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
अनेक तरूण-तरूणीं हे स्पर्धा परिक्षाकरिता पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर सारख्या ठिकाणी राहावं लागतं. तर काहीच्या खिशाला परवडणारी हि ठिकाणं नसतात. हिच बाब लक्षात घेऊन आपल्या डिव्हीपी स्केअर मध्ये लायब्ररी सुरू करण्यात आली आहे नक्कीच तालुक्यातील अनेक तरूण तरुणीं यातून याचा लाभ घेऊन यशवंत अधिकारी घडतील.
यामध्ये लायब्ररीत २४तास तरूणांना प्रवेश देण्यात येईल, श्री.कदम साहेब व श्री.बेल्हेकर साहेब, श्री.गुरवसाहेब यासारख्या प्रशासन अधिकाऱ्यांनी देखील महिन्यातून एकदा येऊन तरूणांना मार्गदर्शन करण्याचे अवाहन केले. लोकोपयोगी उपक्रमात नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यावेळी राजकीय, सामाजिक, तसेच सरपंच, तरूण मित्र, विद्यार्थी उपस्थित होते.