Uncategorized

स्वेरीच्या काजल यादव यांची ‘ऍमडॉक्स’ कंपनीमध्ये निवड मिळाले रु. ४ लाखांचे पॅकेज

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व ‘ऍमडॉक्स’ कंपनीत निवड झालेल्या काजल यादव.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूरः ‘ऍमडॉक्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील काजल अनिल यादव यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणासाठी होत असलेली गैरसोय पाहून आणि पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांची वाढती मागणी पाहून सन १९९८ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) मध्ये स्वेरीची स्थापना झाली. तेंव्हापासून शैक्षणिक पद्धतीत नवनवीन बदल, विविध उपक्रम राबवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाला योग्य दिशा देण्याचे कार्य स्वेरी आजतागायत करत आहे. हे पाहून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील स्वेरीत प्रवेश घेत विकासाकडे झेपावत असल्याचे दिसून येत आहे. ऐन कोरोना महामारीच्या कालावधीत देखील कॅम्पस प्लेसमेंट द्वारे मुलाखती सुरूच होत्या. त्यातूनच काजल यादव यांची ‘ऍमडॉक्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत नुकतीच निवड झाली. या यशाचे श्रेय त्या पंढरपुरच्या स्वेरीतील डॉ. बी.पी. रोंगे सर आणि त्यांच्या नियोजनबद्ध प्राध्यापक वर्गाला देतात. स्वेरीतील शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासक्रमाला आणि मार्गदर्शनाला विशेष प्राधान्य त्यांनी दिले. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. संबधित विद्यार्थ्यांना स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. अशातच काजल यादव यांना ‘ऍमडॉक्स’ कंपनीत चार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्यांना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार व इतर प्राध्यापक तसेच प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या काजल अनिल यादव यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close