Uncategorized

आंदोलनाच्या काळात केसेस झाल्यास मोफत लढणार– ॲड. धनंजय पाटील.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगली प्रतिनिधी :- डॉ. रामदास नाईकनवरे. दि. ३
महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करून घ्यावे. याबाबत आटपाडी एसटी आगारातील कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री. धनंजय पाटील यांनी भेट दिली.त्यावेळी बोलताना कोणत्याही एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या करू नये. आंदोलन कायदेशीर मार्गाने करावे . आमदार श्री. अनिल भाऊ बाबर यांच्या मार्फत आपण राज्यशासनाची चर्चा करून मार्ग काढावा. व प्रवाशांची गैरसोय टाळावी. असे ॲडवोकेट श्री. धनंजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना सुचवले. तसेच सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असताना जर कर्मचाऱ्यांवर केसेस दाखल झाल्या तर त्या विनामूल्य लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी व श्री. प्रकाश मरगळे तसेच सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close