Uncategorized

महाविकास आघाडी च्या विरोधात आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने आंदोलन…..

सांगली :-डाँ. रामदास नाईकनवर (आटपाडी) प्रतिनिधी:- दि.२०आक्टोंबर
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यावतीने महाराष्ट्र भर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज आटपाडी पोलिस स्टेशन येथे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने व निदर्शने करण्यात आली. आपल्या मागण्या संदर्भातील निवेदन आटपाडी चे पी आय निंबोरे साहेब यांना देण्यात आले.
आर पी आय सांगली जिल्हाध्यक्ष मा राजेंद्र खरात, तालुका सरचिटणीस मा.धनंजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व कार्यकारणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विविध मागण्यां घेऊन सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विशाल काटे यांच्यासह आटपाडी तालुका सर्व कार्यकारणी,व आटपाडी तालुक्यातील तडवळे ,बनपुरी, झरे, विठ्ठलापूर,खरसुंडी, करगणी, सर्व शाखेचे पदाधिकारी व आटपाडी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close