संभाजी ब्रिगेड पुनर्गठन – पुनर्बांधणी बैठकीचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा,पंढरपूर विभागाची पुनर्गठन – पुनर्बांधणी बैठकीचे आयोजन पंढरपूर येथे बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी,शेठ मोरारजी कानजी धर्मशाळा,स्टेशन रोड,येथे सायं ४ वाजता करण्यात आलेले आहे.
सदर बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोलजी काटे हे प्रमुख म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.तसेच,संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोषजी गव्हाणे व माजी प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील हे ही उपस्थीतीत राहणार आहेत.या प्रसंगी प्रदेश संघटक प्रदिपजी कणसे,कोकण विभागीय अध्यक्ष सचित सावंत देसाई व पुणे विभागीय अध्यक्ष दिपक वाडदेकर,नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे,नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे तसेच नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे हे उपस्थितीत राहणार आहेत.
सदर बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा,पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्ष,पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणीचा विस्तार करुन नव्या पदाधिकार्यांची निवड करण्यात येणार आहे.तसेच,मंगळवेढा शहर व तालुका मधील शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे.त्यासाठीची स्वतंत्र बैठक मंगळवेढा येथे संपन्न होणार आहे.
तरी सदर बैठकीस पंढरपूर तालुक्यातील व शहरातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंस्थेने उपस्थितीत रहावे असे आवाहन पंढरपूर तालुकाध्यक्ष डाॅ.रामदास घाडगे,शहराध्यक्ष लखनराज थिटे,सांगोला तालुकाध्यक्ष प्रदिप मिसाळ – पाटील,सांगोला शहराध्यक्ष राजू शिंदे,पंढरपूर शहर उपाध्यक्ष शनी घुले यांनी केलेले आहे.