नामदेव चांदणे यांचा वाढदिवस सॅनेटायजर व मास्कचे वाटप करुन साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अहमदनगर-(सागर साळवे)अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामधील ज्येष्ठ समाजसेवक नामदेवराव चांदणे यांच्या वाढदिवसनिमित्त भिंगार येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने कैलास साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दलित, पीडित, शोषित, उपेक्षित, वंचीत, दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.त्यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी असंख्य मोर्चे, आंदोलन, निदर्शने चळवळ उभी करून शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडविण्याचे काम केले.शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.सामाजिक योगदानाबद्दल व कार्यासाठी आजतागायत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सॅनेटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी कैलास साळवे,सुनिल उमाप सर, दलित महासंघाचे सुरेंद्रसिंग घारू, प्रवीण जाधव,लहुजी महासंघाचे नेते सचिन नवगिरे,अवि शेंडगे,भोसले दादा, लहुसंग्रामचे सागर गायकवाड,राकेश जगधने, लहुजी शक्ती सेनेचे सुनिल सकट आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.