संजय राऊत यांची अटक बेकायदेशिर ठरवून न्यायालयाने जामिन मंजूर केला हा सत्याचा विजय-संजय घोडके
पंढरीत साखर पेढे वाटून साजरा केला जल्लोष

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-शिवसेनेचे प्रवक्ते व “सामना”चे कार्यकारी संपादक संजय राऊत यानी उध्दव ठाकरे यांना सोडावे व भाजपमध्ये यावे यासाठी भाजपने सुडबुध्दीने ईडीला कारवाई करण्यास सांगुन तिन महिने तुरुंगात डांबून ठेवले परंतू ठोस पुरावा ईडीकडुन न आल्याने ही अटक बेकायदेशिर ठरवून कोर्टाने जामीन मंजूर केला असून सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाचे निर्णयाने स्पष्ट झाले आहे अशी भुमिका शिवसेना ठाकरेगटाचे तालुकाध्यक्ष संजय घोडके यांनी व्यक्त केली. तहसील कार्यालय पंढरपुर येथे शिवसैनिकानी आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी ते माध्यमासमोर बोलत होते.पुढे बोलताना घोडके म्हणाले की संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचा सर्व शिवसैनिकांना आनंद झाला असून साखरपेढे वाटून सर्वांनी जल्लोष साजरा केला आहे.
यावेळी काकासाहेब बुरांडे, लंकेश बुरांडे, रेहना भाभी,अनिता आसबे,मंजुळा दोडमिसे इम्तीयाज तांबोळी,स्वप्निल गावडे,शामराव सुरवसे, एस.के.शेख,अंबादास मराठे,प्रणीत पवार, चेतन नेहतराव, पप्पू पितळे,उमेश काळे चिलाईवाडी, महेश कांबळे ,गौशपाक आतार,समाधान जगदाळे तावशी,नामदेव चव्हाण बाभुळगाव,महादेव पोरे,वैभव ननवरे,वाखरी महेश जगताप,पुळूज,कृष्णदेव लवटे कौठाळी,संदीप गायकवाड़ ओझेवाडी,आदी उपस्थित होते.