Uncategorized

राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन अंतर्गत पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या संशोधन प्रकल्पांना नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर

 

छायाचित्र- डॉ.पद्माकर केळकर, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह, प्रा.ज्योती केंदुळे.

.जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या स्कीम अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागासाठी ‘डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर, इंस्टॉलेशन अँड कमिशनिंग विथ ट्रायल ऑफ सोलर पॉवर्ड सिंगल टॉवर पिवोट इरीगेटींग सिस्टीम’ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागासाठी ‘आयओटी अँड मायक्रोस्कोपीक इमेजेस बेस्ड पॅथॉलॉजी सिस्टीम फॉर रुरल हेल्थकेअर’ अशा दोन प्रकल्पांना प्रत्येकी चार लाख नव्वद हजार रुपये संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा संशोधन विभाग आणि संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. पद्माकर केळकर आणि डॉ. संदिप वांगीकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून ‘डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर, इंस्टॉलेशन अँड कमिशनिंग विथ ट्रायल ऑफ सोलर पॉवर्ड सिंगल टॉवर पीवोट इरीगेटींग सिस्टीम’ आणि प्रा.ज्योती केंदुळे, प्रा.हुसेन भालदार यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून ‘आयओटी अँड मायक्रोस्कोपीक इमेजेस बेस्ड पॅथॉलॉजी सिस्टीम फॉर रुरल हेल्थकेअर’ या विषयांवर आपला संशोधन प्रस्ताव, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन स्कीम अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडे सादर केला होता. सदर प्रस्तावाला पिअर रिविव्ह कमिटी, सोलापूर विद्यापीठ कडून मान्यता मिळालेली आहे. तसेच या प्रकल्पाच्या संशोधन निधीबाबतचे पत्र व निधी महाविद्यालयास प्राप्त झालेले आहेत. डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रकल्पामध्ये सौर उर्जेवर चालणारे सिंगल फेज टॉवर पिवोट इरिगेशन सिस्टीम विकसित केले जाणार आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि औषध फवारणी, पाण्याच्या बचतीबरोबरच उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी, तसेच कमीत कमी कालावधीमध्ये पिकांची योग्य वाढ होण्यासंदर्भातील संशोधन केले जाणार आहे. प्रा.ज्योती केंदुळे यांच्या संशोधन प्रकल्पाचा हेतू ‘विद्यमान सूक्ष्म उपकरणांचा वापर करून ते इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि प्राथमिक निदान मिळवण्यासाठी सेटअप विकसित करणे, ग्रामीण आरोग्य केंद्रांवर सूक्ष्म प्रतिमा विश्लेषण (मूलभूत) विकसित करणे आणि प्रगत विश्लेषणासाठी प्रमाणित तज्ञांची मते मिळवणे हा आहे. ह्या संशोधनाचा उपयोग सामुदायिक सेवांसाठी करता येऊ शकतो. या संशोधन प्रस्तावांना मान्यता व संशोधन निधी प्राप्त झाल्याने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्व प्राध्यापक-संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close