Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी वर्षा गडहिरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सांगोला* :-दि.२२जूलै गुरूवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी सांगोला येथील वर्षा गडहिरे यांची निवड करण्यात आली असून पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले.
निवडीनंतर बोलताना वर्षा गडहिरे म्हणाल्या महिलांच्या साठी अन्यायाच्या विरोधात लढत असताना विधवा ,परितक्त्या महिलांच्या साठी शासकीय योजना व त्यांची माहिती हे सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचवून सामाजिक प्रबोधन करून महिला सक्षम कशा बनतील असा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून संघटनेच्या ध्येयधोरणाशी बांधील राहीन.


