
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी दि .३ ( प्रतिनिधी )
स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल , जीवनावश्यक वस्तूंची झालेली प्रचंड भाववाढ आम आदमी च्या जीवावर उठणारी असून कोरोणाच्या महामारीत १६ महिने पिढुन निघालेल्या सर्वसामान्यांनी आता जगावे कसे हे मोदी – शहा – भाजपाई सांगतील का ? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी करून मोदी सरकारचा तीव्र निषेध करीत तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी येथे आंदोलन केले .
आटपाडीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव बापू पाटील, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी सादिक खाटीक , वसंतदादा जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णूपंत पाटील , ज्येष्ट नेते कल्लाप्पा नाना कुटे ,युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रा.एन. पी . खरजे , युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, महिला नेत्या सौ अनिता पाटील, तालुका अध्यक्षा सौ अश्विनी कासार अष्टेकर इत्यादी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली साठे चौक आटपाडी येथे केंद्र सरकार च्या विरोधात तीव्र निषेधाचे आंदोलन करण्यात आले .
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतराव पाटील साहेब यांच्या सुचनेवरून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले . पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ होण्यास कारणीभूत ठरल्या बद्दल मोदी सरकार आणि भाव वाडीच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या . नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले .
महागाईचा भडका उडवणारी इंधन आणि गॅस ची दरवाढ कमी न झाल्यास यापुढच्या काळात भाजपा खासदारांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याची सुचना राष्ट्रवादी काँग्रेसने विचारात घ्यावी अशी भूमिका ज्येष्ट नेते रावसाहेब काका पाटील यांनी व्यक्त केली . राष्ट्रवादी च्या नेत्यांवर बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला .
मनमोहनसिंग सरकार च्या काळात गॅस सिलेंडर वर सरासरी २५० रुपये प्रति सिलेंडर अशी १२ सिलेंडरसाठी ३००० रुपये सबसिडी मिळत असे . मोदी सरकारने ही सबसीडी इतिहास जमा केलीच तथापि युपीए सरकारच्या काळात ३५० रुपयेच्या आसपास मिळणाऱ्या गॅस सिलेंडर चे दर ८५० रुपयापर्यत नेऊन पोहचवले आहेत . ४० ते ६० रुपये पर्यत असणाऱ्या डिझेल पेट्रोलने दरवाढीचा नवा उच्चांक नोंदविला आहे. शंभरी च्या जवळ पास डिझेल पोहचले तर पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे . जीवनावश्यक प्रत्येक वस्तूंचे भाव दुपटीने वाढल्याने सामान्य माणसाला दिवसा चांदण्या दिसू लागल्या आहेत . येणाऱ्या ऑक्टोबर पर्यत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात ६० टक्के दरवाढ होण्याच्या शक्यतेने आम आदमी चे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत . ऑक्टोबर पर्यत ही कथीत दरवाढ झाली तर घरगुती गॅस सिलेंडर साठी सुमारे तेराशे रुपयापर्यत पैसे मोजावे लागण्याची शक्यता अंगावर काटा आणणारी आहे.असे रावसाहेब काका पाटील, सुशांत देवकर, आनंदरावबापु पाटील, हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक, एन.पी . खरजे,सौ . अनिता पाटील, सौ . अश्विनी अष्टेकर – कासार , विजय पुजारी इत्यादींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले .
कोरोणा महामारीत लॉकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले, सर्वसामान्यांचे व्यवसाय मोडकळीस आले . आम आदमी चा आर्थिक स्तर निचांकी पातळी पर्यंत पर्यत घसरला .इंधन आणि गॅस च्या दरवाढीने सर्वसामान्यांचे, गृहीणींचे बजेट पूर्णत: कोलंमडले आहे . गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. २०१४ पूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती अर्ध शतका पर्यत आल्यावर आकाश पातळ एक करणारे देशातले – राज्यातले भाजपाई आता रेकॉर्ड ब्रेक महागाई च्या वेळी कोठे दडून बसले आहेत . त्यावेळचे काही आंदोलन कर्ते भाजपा नेते केंद्रात मंत्रीपदावर ही आहेत . हे या देशाचे, सर्वसामान्यांचे दुर्देव आहे . मोदी सरकारने लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असाही इशाराही या नेत्यांनी यावेळी दिला .
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, दुसरे उपाध्यक्ष शशिकांत भोतले, तालुका सरचिटणीस समाधान भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज भोसले, आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, अर्जुन भोसले सतीश भोसले, रविंद्र भोसले, नितीन डांगे, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, अतुल जावीर सौ . अश्विनी गायकवाड, सौ . आशाताई देशमुख, ज्ञानेश्वर होळे प्रशांत गवळी, दत्ता कांबळे, संतोष बाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते .