दक्षिण कोरिया तील युऊनम युनिव्हर्सिटी तून नँचरल सायन्सेस अँन्ड केमिकल सायन्सेस या विषयावरील संशोधनासाठी मोहसीन तांबोळी यांची निवड
आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले तांबोळी कुटूंबाचे कौतुक

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
जगातील १८२ देशांतून वर्ल्ड सायंटिस्ट अँन्ड युनिव्हर्सिटी २०२१ मध्ये दक्षिण कोरिया तील युऊनम युनिव्हर्सिटी तून नँचरल सायन्सेस अँन्ड केमिकल सायन्सेस या विषयावरील संशोधनासाठी भाळवणी चे येथील रहिवासी सुपुत्र मोहसीन तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल मोहसीन तांबोळी यांचे वडील सलीम भाई तांबोळी यांचा सत्कार आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिचारक यांनी तांबोळी कुटुंबांचे शिक्षणातील प्रगतीबद्दल त्याचे कौतुक केले अल्पसंख्याक समाजात मोहसीन तांबोळी यांनी आदर्श निर्माण केले असे गौरवोद्गार काढले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ह्या वेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती बशीर तांबोळी,छोटा कब्रस्तान मस्जिद चे सदर (अध्यक्ष) इस्माईल नाडेवाले, तांबोळी जमात चे माजी अध्यक्ष अस्लम तांबोळी, अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक इक्बाल गोटे (सर).कादर भाई तांबोळी, वसीम पटवेकरी,नुर शेख,भैय्या तांबोळी,नदीम तांबोळी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते सर्वसामान्य पान व्यापारी चा मुलगा जगाच्या पाठीवर नाव लौकीक केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे


