Uncategorized

एरंडोली ग्रामपंचायत सर्व दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करा

पुरोगामी संघर्ष परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

 

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत लोखंडे यांना निवेदन देताना सौ स्वाती सौंदडे ,सौ रतन लोखंडे ,सर्जेराव भंडारे इत्यादी

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगली:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत लोखंडे यांना एरंडोली तालुका मिरज येथील घरपट्टी वसूल घोटाळाप्रकरणी जे पाच कर्मचारी आहेत व चौकशी समितीने ज्याना दोषी ठरवले आहे अशा सर्वच कर्मचाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करा पाच पैकी फक्त एकावरच गुन्हा दाखल करून प्रशासनाने परत घोटाळा केला की काय असा संशय आल्याने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी प्रशांत लोखंडे यांची भेट घेऊन सर्वच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ रतन लोखंडे, पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस सौ छाया मोरे, सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस सर्जेराव भंडारे, विजय सौंदडे ,राकेश लोखंडे, बबन मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते निवेदनात शेवटी राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close