Uncategorized

राज्यस्तरीय फिटनेस एरोबिक्स कार्यशाळेचे पंढरीत आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-सोलापूर शहर व जिल्हा स्पोटर्स एरोबिक्स व फिटनेस असोसिएशन व महाराष्ट्र स्पोटर्स एरोबिक्स व फिटनेस असोशिएशनच्या मान्यतेने दि. 22 जून ते 25 जून रोजी पंढरपूरमध्ये शिवयोगी मंगल कार्यालय, लिंक रोड पंढरपूर येथे राज्यस्तरीय फिटनेस एरोबिक्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा चित्रा गायकवाड यांनी दिली आहे.
फिटनेस एरोबिक्स म्हणजे संगीताच्या तालावर, तालबद्द व नियमानुसार केलेला व्यायाम प्रकार आहे. सदर खेळ हा चार प्रकारामध्ये शिकविला जातो. स्पोर्टस एरोबिक्स, फिटनेस एरोबिक्स, स्टेफ एरोबिक्स, हिप हॉप एरोबिक्स या चार प्रकारे शिकविला जातो. ऐरोबिक्स हा खेळ जगातीक पातळीवर खेळ म्हणून 1996 पासून खेळला जातो. भारतात सन 2001 पासून राष्ट्रीय महासंघाकडून याचा प्रचार, प्रसार व स्पर्धा होत आहेत.
एरोबिक्स खेळामुळे वजन कमी होते. शरिराला ऑक्सीजनचा पुरवठा नियमीत होतो. ह्रदयाची स्पंदन व्यवस्थीत होते. शरिराची रक्ताभिश्रण क्रिया व्यवस्थित होते. खेळाडूंना सर्व आजारापासून दूर ठेवण्यासाठी एरोबिक्स व्यायामाची मदत होते. सदर खेळाला भारतात सी.बी.एस.ई. बोर्डाला व महाराष्ट्र राज्य बोर्डाला शालेय महासंघाची मान्यता असून ऐरोबिक्स खेळाडूंना सर्व शासनाच्या सवलतीचा लाभ मिळतो अशी माहिती राष्ट्रीय ऐरोबिक्स संघटनेचे सचिव संतोष खैरनार यांनी दिली आहे.
सदर शिबीरास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरैय्या खैरनार हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सखोल तांत्रिक मार्गदर्शनाखाली ऐरोबिक्स शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा फायदा जास्तीत जास्त क्रीडाशिक्षक, फिटनेस ट्रेनर व जीम ट्रेनर यांनी घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव सुधाकर गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8087542892, 9850329359 या नंबरवर संपर्क साधावा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close