छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाला मानवी मूल्यांचे अधिष्ठान होते:सौ.रतन लोखंडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- दि.१३ मे पुरोगामी संघर्ष परिषद सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वैशाख शुध्द द्वितीया तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.(कोरोनाचे नियम पाळून)छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सांगली जिल्हा शहर अध्यक्षा सौ. संगीता साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या अध्यक्षा सौ. रतन लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला मानवी मूल्यांची जोड होती आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवूया.
कुपवाड शहराध्यक्षा सौ शुभांगी साळुंखे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.यावेळी चिंगूबाई मोरे,लक्ष्मी वडर, अमृता साठे उपस्थित होत्या.
शेवटी आभार वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सावळा(अण्णा)खुडे यानी मानले.