Uncategorized

कोरोना मुळे जगणे व जगविणे कठीण:अमोल लांडगे

लसीकरणाबाबत शासनाने शहर व ग्रामीण भेदभाव करु नये

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रोकांत कसबे

आटपाडी:-कोरोनारूपी असुरांचां उद्रेक सुरू असुन ग्रामीण भागात हजारो निष्पाप निरागस लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागले आहे .तर आपल्या सरकारचा कल ग्रामीण भागात कमी आणि शहरी भागात अधिक असल्याचा दिसत आहे असा आरोप पुरोगामी संघर्ष परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लांडगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की सध्याचे ग्रामीण भागाचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरीब लोकांची रोजी रोटीला पुर्ण विराम मिळाला आहे. तर जगायचे कसे आणि जगवायचे कसे हा प्रश्न कोरोना पेक्षा ही जास्त भेडसावत आहे. चीन ची मस्ती इथल्या दारात आली आहे. कर्ते धर्ते तरुण यांच्या जाळ्यात अडकत आहेत एकीकडे शहरी भागातले लसीकरण मोहिम सुरू असून तीच लसीकरण मोहिम ग्रामीण भागात पोहचत नाही. ग्रामीण भागातील गोरं गरीबांना काय करावे ते कळेना झाले आहे. ४४ वयोगटातील व्यक्ती ची लसीकरण मोहिम राबवली पण त्यात आँनलाईन नोंदणीची मेख रोवली गेली हे कशासाठी ?आणि का? अठरा विश्व दारिद्र्यत जगणारा अशिक्षित माणूस कसा लसीकरणाची नोंदणी करणार ते सांगा? ग्रामीण भागातील माणसंही वाचावी असे वाटतं असेल तर ग्रामीण भागात घर टु घर लसीकरण मोहिम राबवली जावी अशी मागणी केली आहे. पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा प्रा सुभाष वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला जाब विचारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.असे पत्रकाचे शेवटी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close