Uncategorized

पत्रकारावरील हल्ले म्हणजे देशविरोधी कृत्य:प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जाहीर निषेध

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

इस्लामपूर:- अनेकदा पत्रकारावर होत असलेले हल्ले हे पत्रकारांनी अवैध धंद्या विरोधात उठवलेला आवाज,राज्यकर्त्यांनी शासकीय योजनांमध्ये केलेला भ्रष्टाचार जनतेपुढे आणल्यामुळे, राज्यकर्त्यांची राजकीय गुंडगिरी आणि पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात उठवलेला आवाज याच प्रमुख कारणामुळे होतात.इतर कारण लावून पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत .हे भ्याड हल्ले हे देश विरोधी क्रुत्य आहे.अशा हल्ल्याचा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे पत्रक संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी काढले असुन पत्रकात पुढे म्हटले आहे की, पत्रकार हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मधला एक घटक आहे. अशीच घटना अहमदनगर मध्ये घडली व उपसंपादक असलेले मुरलीधर तांबडे यांच्यावर हल्ला झाला.
सदर हल्ल्याची रितसर चौकशी होऊन हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी या प्रसिद्धिपत्रकाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close