पंढरपूर नगरपरिषद च्या सहकार्यातून ५० ऑक्सिजन बेड असलेले विठ्ठल रुक्मिणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन
गरज पडल्यास ५० बेडचे अजून एक अद्यावत कोविड सेंटर उभा करणार -आमदार प्रशांतराव परिचारक

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर;-पंढरपूर नगर परिषदेच्या सहकार्यातुन 65 एकर भक्ती सागर येथे डॉ अमित गुंडेवार व डॉ पंकज गायकवाड यांच्या विठ्ठल रुक्मिणी डी.सी.एच.सी.कोव्हीड हेल्थ सेंटर उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते आमदार समाधान दादा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,प्रांताधिकारी सचिन ढोले ,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,पक्ष नेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर , उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक शकुंतला नडगिरी ,संजय निंबाळकर जगदीश जोजारे, विवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की गेल्या वर्षी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुमारे 55 लाख रुपये खर्च करून हे कोविड केअर सेंटर उभा करण्यात आले होते. गेल्या वर्षभरामध्ये या कोविड केअर सेंटर चा रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी चांगला उपयोग झाला होता .परंतु सद्य परिस्थितीमध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील व तालुक्यातील नागरिकांची ऑक्सीजन बेडची कमतरता लक्षात घेऊन याठिकाणी 50 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देण्या संबंधीचा निर्णय नगरपरिषद ने घेतला होता. त्यास अनुसरून डॉ पंकज गायकवाड व डॉ.अमित गुंडेवार यांनी पुढाकार घेत हे 50 ऑक्सिजन बेड चे हॉस्पिटल उभा केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जर आणखीन गरज पडली तर 50 बेड चे ऑक्सिजन रुग्णालय उभा करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले . तसेच लवकरच पांडुरंग व युटोपीयन कारखान्याच्या वतीने सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर ची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजनची निर्मिती करून लवकरात लवकर ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जाईल . त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच नूतन आमदार समाधान दादा अवताडे यांनी या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी व या हॉस्पिटलमुळे पंढरपूर व परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात उपचाराचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. आमदार म्हणून कोणतीही अडचण आल्यास निश्चितपणे मदत करेन असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ गिराम ,माजी नगरसेवक निलराज डोंबे सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके , भैया देशमुख , नरेंद्र डांगे डॉ मिलिंद देशपांडे हे उपस्थितीत होते
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ अमित गुंडेवार यांनी केले तर आभार पक्षनेते अनिल अभंगराव यांनी मानले. सूत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.