शासनाने दुर्लक्ष केल्यानेच कोरोना फैलावला:अमोल लांडगे
कोरोनात मानसिकता प्रबळ ठेवणे महत्त्वाचे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी:-गेल्या वर्षीच कोरोना काळाचे गांभीर्य शासनाने घ्यावा हवं होतं जनतेला
मोकाट सोडुन दिलं व राजकीय कार्यक्रमावर भर दिला आणि कोरोना फैलावला याचा पुर्ण त्रास सर्वसामान्य जनतेलाच होत आहे असा घणाघाती आरोप पुरोगामी संघर्ष परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लांडगे यांनी केला .आटपाडी येथे कोरोनाने हतबल झालेल्या कुटुंबाना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की,नियमांचे पालन करा, संसर्ग होऊ देऊ नका, हे संकट कृत्रिम आहे .राज्याध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो फायनान्स ची कर्ज व राष्ट्रीय बँकाकडुन मिळणाऱ्या सवलती आणि शासनाची भुमिका याबद्दल आक्रमक होऊन एक संघ राहुन पुन्हा आपले संसार सावरु या.याप्रसंगी सांगली जिल्हा महीला अध्यक्ष स्वाती सुहास लांडगे , माधुरी चव्हाण, मंगला लोंखडे व इतर महीला उपस्थित होते