Uncategorized

कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अनवलीमध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन

 

स्वेरीजछायाचित्र- स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अनवली मध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन प्रसंगी अनवलीचे सरपंच वल्लभ घोडके यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार सोबत डावीकडून प्रा.हेमंत बनसोडे, संकर्षण डोके, डॉ. मिथुन मणियार, श्री. बिरूदेव कोकरे, श्री. संजय माळी, श्री. तोफिक शेख, श्री. संदीप डिसले, श्री. चांगदेव घोडके

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने अनवली (ता. पंढरपूर) मध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजन सरपंच वल्लभ घोडके यांच्या हस्ते करून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. मिथुन मणियार यांनी दि.२३ जानेवारी पासून ते दि. २९ जानेवारी २०२४ पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिराची संपूर्ण रूपरेषा व यासंबंधी सविस्तर माहिती दिली. पोलीस पाटील तौफिक शेख यांनी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या स्वयंसेवकांचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, ‘स्वेरीचे शैक्षणिक उपक्रम नेहमीच चांगले असतात. मागच्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी स्वयंसेवकांना अनवली ग्रामस्थ मंडळींकडून यथोचित सहकार्य मिळण्याची ग्वाही मी देतो.’ असे सांगून स्वेरीच्या उपक्रमाचे स्वागत केले. तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात ग्रामस्वच्छ्ता अभियान, श्रमदान, ‘महीलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर पंढरपूर पंचक्रोशीत अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या डॉ. बी.पी.रोंगे हॉस्पिटल तर्फे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांचे व्याख्यान, वृक्ष लागवड, ह.भ.प. प्रा.गुरुराज महाराज इनामदार यांचे ‘अंधश्रद्धा व बालविवाह निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान, डॉ. संजय मुजमुले यांचे ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या विषयावर व्याख्यान तसेच विविध सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्य यांचा समावेश आहे. आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी उपसरपंच संदीप डीसले, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, माजी उपसरपंच चांगदेव घोडके, महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार विजेते तौफिक शेख, बिरुदेव कोकरे, सचिन शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी संकर्षण डोके, रा.से.यो. चे सर्व स्वयंसेवक व अनवली ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. अनवलीचे ग्रामस्थ या शिबिराला उत्तम सहकार्य करत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close