Uncategorized
अमेरिका भारताला कोविड प्रकरणी मदत करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर:- सध्या जगभरात कोरोना महामारीने हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन यांच्यात कोविड मुळे उद्भवलेल्या संकटावर फोनवरून चर्चा झाली. हि चर्चा सकारात्मक झाली असुन अमेरिका भारताला मदत करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका प्रचंड ताण तणावात होती त्यावेळी भारताने आम्हाला मदत पाठविली होती. आता भारतावर कोविडचे संकट आले असल्याने आम्ही मदत करणार असल्याचे जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका भारताला लसी साठी कच्चा माल पाठविणार असुन वैद्यकीय सामुग्री पाठविणार असल्याचे समजते.