ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करा- दिलीप स्वामी
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा सोलापूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापूर-5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेवून खालील बाबी कराव्यात
गावात सभागृह हॉल निश्चित करावा
तेथे संडास बाथरूम व पाण्याची व्यवस्था करावी
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
दिवाबत्ती व्यवस्था करावी
सदर जागेचे स्थळ निरीक्षण करावे व वरील व्यवस्था करावी
या ठिकाणी आपल्या ला CCC *कोविड केअर सेंटर* स्थापन करायचे आहे
जेथे
*लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले Positive रुग्ण* दाखल करायचे आहेत. याचा महत्वाचा फायदा म्हणजे
*त्यांची गावातच सोय होईल*
*घरचे जेवण मिळेल*
*डॉक्टरांच्या देखरेखी खालील रहातील*
*जाण्या येण्याचा खर्च वाचेल*
*लक्षणे गंभीर झाल्यास लगेच पुढे DCHC व DCH ला संदर्भ सेवा देता येईल*
यासाठी गावातील डॉक्टरांच्या सेवा घ्याव्या…त्यांना विनंती करून त्यांचे सेवेचे वेळापत्रक तयार करावे
*औषधे जिल्हा परिषद पुरवेल*
गावातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांचेकडून जेवण किंवा इतर आवश्यक वस्तू साहित्य घेता येईल यासाठी त्यांना आवाहन करावे.
या सर्व बाबांसाठी सरपंच ग्रामसेवक व सदस्यांनी पुढाकार घ्यावा.