लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा गीतसम्राट हरपला–ना.रामदास आठवले

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-जुन्या पिढीतील गितकार हरेंद्र जाधव यांनी भीमगीते ; भावगीते; लोकगीते लिहून मनोरंजनातून जन प्रबोधन केले. त्यांनी 10 हजारांहून अधिक गीते लिहिली. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी अजरामर लोकप्रिय गाणी आहेत. भीमगीतांचा मळा फुलविणारे लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा गीतसम्राट हरपला आहे.अशी भावना केंद्रीय सामाजिक न्याय राजमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
मूळचे नाशिक जिल्ह्यातील असणारे हरेंद्र जाधव हे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ श्रेष्ठ गीतकार आहेत. आंबेडकरी चळवळीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जलसाकारांनी साथ दिली. त्याकाळच्या जलसाकारांचा प्रबोधनपर गीतांचा वारसा हरेंद्र जाधव यांना लाभला. कवी हरेंद्र जाधव यांनी” पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायचा मळा”हे खरंच आहे खर,बाबासाहेब आंबेडकर या सारखी सुप्रसिद्ध गीत लिहिली. त्यासोबत त्यांनी अनेक लोकप्रिय भावगीते, भक्तिगीते, लोकगीते लिहिली. ज्येष्ठ कवी गीतकार हरेंद्र जाधव यांचे काव्याचे वैचारिक अधिष्ठान डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार होता. त्यातून त्यांनी अनेक भीमगिते लिहिली. लोककवी गीतकार प्रबोधनकार म्हणून हरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधानाने आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधी ही भरून येऊ शकत नाही.अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.