देशात आणीबाणी सारखी परस्थिती-सर्वोच्च न्यायालय

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
केेन्द्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
पंढरपूर-कोविडमुळे निर्माण झालेली परस्थिती हि आणीबाणी सारखी भयानक झाली आहे असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार वर ओढले आहेत. केंद्र सरकारचा कोविड बाबत काय प्लँन आहे. आँक्सिजन पुरवठ्याची स्थिती काय आहे .आवश्यक औषध पुरवठ्याची काय स्थिती आहे. लसिकरण प्रक्रियेची स्थिती काय आहे.अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार कडे केली असुन लाँकडाऊन करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असावेत असे ही म्हटले आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प.बंगाल मधील सभा रद्द केल्या असुन उद्या उच्च स्तरीय अधिकार्याची बैठक बोलवली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुध्दा भिक मागा पण आँक्सिजन चा पुरवठा सुरळीतपणे सुरु करा.लोकांच मरण आम्ही पाहू शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आँक्सिजन साठी केंद्र सरकारपुढे हात जोडू पाया पडू मिळेल ते प्रयत्न करु पण आँक्सिजन कमी पडू देणार नाही अशी हमी दिली आहे


