राज्यात पुर्ण लाँकडाऊन करण्याची मंत्रीमंडळाची मागणी
परदेशातुन कोविड लस मागविणेसाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर;-कडक निर्बंध लाऊन ही लोक ऐकत नाहीत. लोक रस्त्यावर दिसतात. रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे चेन तोडायची आहे त्यामुळे पुर्ण लाँकडाऊन लावले पाहिजे अशी मागणी मंत्रीमंडळ बैठकीत करण्यात आली असुन याबाबत नियमावली तयार केली जाणार असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच घोषणा करतील. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.
भारतात उत्पादित होणारी कोवीड लस पुरेशी पडत नाही त्यामुळे परदेशात उत्पादित होणारी लस मिळवण्यासाठी राज्यसरकारला केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन बनविणाऱ्या सात कंपनीच्या मालकासोबत बैठक घेणार असुन मागणी तेवढी इंजेक्शन पुरविण्याबाबत चर्चा होणार आहे.
आँक्सिजन कमी पडू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आँक्सिजन प्लंट तयार केला जाणार असून त्याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. इयत्ता१०चीपरीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र १२ची परिक्षा होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आमचेकडे सेंद्रिय आंबा ठोक व किरकोळ विक्री योग्य दरात केली जाते.
संपर्क साधा-जि.के.गायकवाड, प्रतिभाताई परिचारक नगर
टाकळी रोड पंढरपूर मो.नं.8668839290