Uncategorized

युटोपियन शुगर्स लि.  कारखान्यात देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन व मिल रोलर पुजन उत्साहात संपन्न

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

मंगळवेढा – कचरेवाडी ता. मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्यात देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन आणि उ‌द्योग क्षेत्रातील समृद्धीचे प्रतीक असलेले गळीत हंगाम 2026-27 साठीचे मील रोलर पुजन शनिवार दि. 15/08/2026 रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते देशभक्तीच्या व उत्साही वातावरणात संपन्न झाले. यानिमित्ताने कारखाना व औ‌द्योगीक प्रांगणात तिरंग्याची रोषणाई, देशप्रेम गीते आणि कामगारांचा वाढता सहभाग पाहायला मिळाला.

फोटो ओळीः- युटोपियन शुगर्स लि. या कारखान्यात देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन व गळीत हंगाम 2026-27 करिता आयोजित मील रोलर पुजन कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

यावेळी बोलताना चेअरमन श्री. उमेश परिचारक म्हणाले, “देश आज आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ऐतिहासीक दिवशीच आपण मिल रोलर पुजन करीत आहोत. आपल्या कारखान्याचा हा तेरावा गळीत हंगाम असून मागील 12 ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केलेली आहे. चालू गळीत हंगामात 5.00 लाख मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ट आहे. कार्यक्षेत्रात पाऊस कमी असला तरी जमेची बाजु अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे भिमा नदी व कॅनॉलला पाणी उपलब्ध राहील. तसेच महाराष्ट्रातील सर्वच धरणे भरलेली आहेत. ऊस उत्पादकांनी आजपर्यंत ठेवलेल्या विश्वासास पात्र राहुन या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ. प्रशांतराव परिचारक यांच्या सुचनेनुसार पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व मोहोळ या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.

चालु गळीत हंगामात कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी उपलब्ध असणाऱ्या ऊसातून जास्तीचा ऊस आपल्या कारखान्यात गाळपास उपलब्ध करणार असलेचे सांगीतले. तसेच चिफ टेक्निकल ऑफीसर तुकाराम देवकते यांनी विना स्टॉपेज व विना लिकेज काम करणार असलेचे सांगीतले.

सदर प्रसंगी चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील यांनी व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.

<

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close