Uncategorized

बहुजन पँथर सेना यांच्या वतीने मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- बहुजन पँथर सेना सामाजिक संघटना पंढरपूर शहर यांचे वतीने   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ वेळ : सायंकाळी ६ वाजता क्रांतिवीर लुहजी वस्ताद चौक, मोरे मठा समोर, पंढरपूर मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.संयोजक मार्गदर्शक-अॅड. किशोर (भाऊ) खिलारे संस्थापक अध्यक्ष, बहुजन पँथर सेना सामाजिक संघटना   प्रतिक (आप्पा) रणदिवे अध्यक्ष जयंती उत्सव समिती,स्वप्निल वाघमारे उपाध्यक्ष- सजयंती उत्सव समिती, यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

नांव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:  वधू (१८ वर्षे) व वर (२१ वर्षे) वय पुर्ण असल्याचा दाखला, वधु वराचा शाळा सोडल्याचा दाखला, वधू वराचे पासपोर्ट साईज फोटो, वधू वराचे आधार कार्ड व पॅन कार्ड, वधू वराच्या आई वडीलांचा रहिवासी पुरावा, वधू वरांचे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला जातीचा दाखला,विवाह सोहळ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा:१) विवाह मंडप, पुष्पहार, पुष्पगुच् २) राजा-राणी कपाट, रॅक व संसार उपयोगी प्रत्येकी पाच वस्तू (ताट, वाटी, ग्लास, फुलपात्र, तांबे इ.)३) सर्वांसाठी विवाहस्थळी भोजनाची व्यवस्था ४) पारण्यामध्ये डॉल्बी व बग्गीची व्यवस्था केली जाईल.

नांव नोंदणीसाठी संपर्क: सोनबा वाघमारे मो. 9096747667. पिंटू रणपिसे मो. 9168919181 सागर कांबळे मो. 9850441882 अमोल खिलारे सर मो. 9764300394 सुदर्शन पाटोळे मो. 7499724013 अमित पाटोळे मो. 9158108295 आनंद पाटोळे मो. 9860258288 योगेश वायदंडे मो. 7249101129

नियम व अटी:१) साखरपुडा व हळदी समारंभ कार्यक्रम आपल्या घरीच करावे.२) येथे फक्त लग्र लावले जाईल.

३) विवाह मध्ये जेवणासाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था. ४) विवाह समितीस वर-वधू यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी खोटी कागदपत्रे दिल्यास त्यास समिती जबाबदार राहणार नाही.

नांव नोंदणी अंतिम तारीखः शनिवार दि. १८/०७/२०२६ रोजी पर्यंत राहील

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close