आषाढी वारीमध्ये पंढरपूरात ३२ लाख भावीक
अत्याधुनिक ए-आय तंत्रज्ञान असणारे ड्रोनच्या सहाय्याने मोजणी


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी आषाढी वारी २०२६ यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारी निमीत्त पंढरपूर येथे आलेल्या अचूक मोजणी करण्याचे योजीले होते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी दिवशी भरणारे आषाढी वारीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, यंदाच्या वारीमध्ये ‘SentientLogics’ या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक Cognitive Visual Human Neural AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)” तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला.
या AI तंत्रज्ञानाच्या आधारे दिनांक २४ जुलै ते दिनांक २६ जुलै २०२६ या कालावधीत कालावधीत पंढरपूर शहरात आगमन केलेल्या वारक-यांची अचूक मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी ६,७५,२७४ वारकरी, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी १८,९६,५७३ वारकरी व दिनांक २६ जुलै २०२६ रोजी —६,२६,२८२ असे एकूण ३१,९८,१२९ वारकारी यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिनांक २५ जुलै म्हणजे आषाढी एकादशी दिवशी १८,९६,५७३ वारकरी यांनी आले असल्याचे दिसून आले आहे.
या तंत्रज्ञानची प्रमुख वैशीष्टे –
AI तंत्रज्ञानाची वैशिष्ट आणि अचूक मोजणी पद्धत (Methodology)
पारंपारिक कॅमेरा मोजणी पद्धतीत एकच व्यक्ती अनेक कॅमेऱ्यांसमोर आल्यास त्याची वारंवार नोंद होऊन आकडेवारी फुगते. परंतु सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या AI प्रणालीने पुढीलप्रमाणे काम करून दुबार नोंद पूर्णपणे टाळली.
प्रमुख प्रवेश द्वारांवर AI आयडेंटिटी निर्मिती- पंढरपूर शहरामध्ये १) सरगम चौक ते इंदिरा
गांधी चौक, २) तीन रस्ता ते दगडी पूल, ३) गोपाळपूर पूल ४) सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल, ५) सांगोला चौक एन्ट्री या मार्गावर मुख्य AI कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमे-याच्या मदतीने पंढरपूरमध्ये प्रवेश करणारे प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, कपड्यंचा रंग आणि टोपी, पगडी यांसारख्या वैशिष्ट्यंचा ताळमेळ लावून प्रत्येक वारक-याची एक युनिक ओळख तयार करण्यात येत होती. त्यावरून त्यांची नोंदणी केली.
क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग – वारकरी शहरात फिरताना इतर CCTV कॅमेऱ्यांनी त्यांना पुन्हा पुन्हा न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले, ज्यामुळे दुबार मोजणी झाली नाही.
पुनर्प्रवेश पडताळणी –एखादी व्यक्ती शहराबाहेर जाऊन पुन्हा आल्यास AI ने जुन्याच ओळखीची शहानिशा करून केवळ नवीनच व्यक्तीची नवीन नोंद घेतली.या मोजणी दरम्याने प्रशासनाकडून नागरिक गोपनीयतेचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. भारताचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट आणि GDPR नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सव्र्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही.
पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारक-यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी अचूक गर्दीचा अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते. पारंपरिक पद्धतींमधील त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने AI तंत्रज्ञानाचा वापर करून आषाढी दरम्यान सुमारे ३२ लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठया प्रमाणावर होईल.




