Uncategorized
पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करा-श्रीकांत शिंदे
वर्षांची मुदत असताना 10 व्या वर्षाकडे समितीची वाटचाल,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर-भारतीय संविधानाने आपल्याला राज्यातील सर्व संविधानिक पदावर काम करण्यासाठी एक कालावधी मर्यादा ठरवून दिलेली आहे. राज्यातील निवडणूका सुध्दा दर पाच वर्षांनी घेतल्या जातात. आमदार, खासदार, सरपंच हे देखील पाच वर्षांनी निवडले जात असताना 3 जुलै 2017 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची स्थापना करण्यात आली. 5 वर्षांची मुदत जुलै 2022 रोजी संपली मात्र त्यावर 4 वर्ष झाले म्हणजेच एकूण 9 वर्ष पूर्ण होवून त्या समितीची 10 वर्षाकडे वाटचाल सुरू झाली. राज्यात 4 मुख्यमंत्री बदलले त्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले मात्र मुदत संपलेली मंदिर समिती कुणीही बदलली नाही त्यामुळे मंदिर समिती अस्थायी असली तरी त्याकडे का दुर्लक्ष केले जाते की मंदिर समिती बदलाचा विषय मुख्यमंत्री तथा विधी न्याय खात्याचे मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला जात नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्य पंढरपूरकरांसह भाविकांना पडलेला आहे. विशेष म्हणजे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे वारंवार माहितीचे अधिकाराखाली माहितीची मागणी केली असता योग्य माहिती न देता चुकीची व दिशाभुल करणारे उत्तर दिले जात आहे. केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यात धन्यता मानली जाते त्यामुळे अशा अस्थायी असणारी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी व येणाऱ्या आषाढी यात्रेपूर्वी नवीन मंदिर समितीची स्थापना करण्यात यावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, मंदिर पुर्णपणे सरकारच्या ताब्यात तेरा वर्षे पूर्ण आले एक तपापेक्षा जास्त कालावधी होत असताना आज आपल्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलत असतानाही 9 वर्षापुर्वी स्थापन करण्यात आलेली मंदिर समिती बरखास्त करून महायुती मधील कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना सेवा करण्याची संधी देण्यात यावी व या समितीत पुर्वीच्या कोणत्याही सदस्यांना संधी देण्यात येवू नये नव्या कार्यकर्त्यांना व वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळींना संधी द्यावी.
कारण 2019 ला विधानसभा निवडणूकीवेळी तत्कालीन अध्यक्ष आ. अतुल भोसले यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त असून अनेक सदस्य मासिक मिटींगला उपस्थितही नसतात, ही खेदाची बाब आहे. कारण ज्यांना पंढरपूरात मिटींगला येवू वाटत नाही केवळ ऑनलाईन मिटींगला उपस्थित राहतात त्यांना पदावर राहण्याचा देखील अधिकार नाही. सध्या ठराविक सदस्य यांची मक्तेदारी असल्यासारखे मंदिरात झाले असून आपल्या आदेशाने तत्काळ ही मंदिरे समिती बरखास्त करून नवीन कार्यकारणी नेमावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे.





