कुचेकर कुटुंबाला न्याय देण्यासाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने 23जुनापासून आमरण उपोषण


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :- गादेगाव येथे अनिल चंद्रहार कुचेकर हे त्यांच्या वडील भाऊ पत्नी मुलासह सिद्धनाथ गृहनिर्माण संस्था गादेगाव सर्व सभासदांच्या सहमती निवड गावठाण क्रमांक एक मधील प्लॉट क्रमांक एक मध्ये सन 1976 पासून राहत आहेत. सदर जागी असेल लाईट बिल त्यांना येत असून पाणीपट्टी ही त्याने भरली आहे. या जागेवर शेजाऱ्यांनी दावा केला व तक्रारी अर्ज केला त्याची दखल घेऊन जेसीबी च्या साह्याने त्यांची घर उध्वस्त करण्यात आल्याने अनिल कुचेकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख प्रमुखापर्यंत तक्रार दाखल केली. परंतु त्याची दखल न घेतल्याने बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे व अनिल कुचेकर रमेश कांबळे यांनी धरणे आंदोलन पंचायत समिती समोर केले. त्याची दखल घेऊन एक आठवड्यात संबंधितावर कारवाई केली जाईल असे आश्वासन गट विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले परंतु दोन महिने झाले तरी सुद्धा गट विकास अधिकारी यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे 23 जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे व पीडित कुटुंबातील सदस्य अनिल कुचेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे दिली असून त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे केले आहेत.
प्रमुख मागण्या १) कुचेकर यांचे राहते घर पाडते वेळेस चुकीच्या पध्दतीने रिपोर्टंग करणारे व समक्ष हजर राहुन गावठाण क्र.१ मधील प्लॉट क्रं.२ मधे अतिक्रमण केले आहे का याची खातर जमा न करणारे अधिकारी रकटे विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी भुजबळ यांना त्वरीत निलंबीत करावे.२) पोलीस बंदोबस्त देता वेळेस कोर्ट,जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,तहसिलदार, यांचा अतिक्रमण काढण्याचा आदेश असल्याची प्रत आम्हाला मिळावी.३) बाबासाहेब राऊ बाबर यांनी प्रशासनाची फसवणूक केली असल्याने त्याच्या वरती फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा.४) कुंडलीक राऊ बाबर यांनी ग्रामपंचायत गादेगांव सहमती स्टॅम्प व्दारे ठराव क्र.४८/२ नुसार गावठाण क्र.१ मधील प्लॉट क्र २ त्याचा भाऊ बाबासाहेब बाबर यांनी दिलेल्यासहमती स्टॅम्पची प्रत आम्हाला मिळावी५) अनिल कुचेकर यांचे पाडलेले घर पुन्हा बांधुन त्यांना कब्जा पावती देण्यात यावी व मोडतोड झालेल्या संसार उपयोगी वस्तुची नुकसान भरपाई मिळावी६) घर पाडत्या वेळेस बिगर नंबरची जेसीबी मशिन जप्त करावी व ट्रॅक्टर व जेसीबी मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा मागण्याचे निवेदन त्यांनी प्रशासनाकडे दिले आहे.
या निवेदन पत्रावर पीडित कुटुंब प्रमुख अनिल कुचेकर व बहुजन समता पार्टी जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिल्लारे यांच्या सह्या आहेत.



