Uncategorized

संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची राज्यस्तरीय बैठक लोणावळा येथे  संपन्न

महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर,:-श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्यकारणीची बैठक  राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे पार पडली असल्याची माहिती सचिव रुपेश खांडके यांनी दिली.
बैठकीमध्ये श्री संत नामदेव महाराज स्मारकाच्या भूमिपूजनाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणामध्ये समाज बंधू-भगिनींना होत असलेल्या अडचणीबद्दल चर्चा करण्यात आली. संबंधित विभागातील अधिकार्‍यांना अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे यांनी सूचना करून अडचणी तात्काळ दूर करण्याची सूचना केली. तसेच समाजाच्या विविध विषययावर चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली. बैठकीस सचिव रुपेश खांडके, उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, नंदकुमार कोसबतवार, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे, कोषाध्यक्ष अनिल गचके, प्रमोद शिंपी, हर्षराज कपडेकर, अ‍ॅड. सागर मांढरे, खेमराज नामा, महिला प्रदेशाध्यक्षा रेखा मुळतकर, पूजा वादवने, मंजिरी कपडेकर यांच्यासह एकसंघाचे सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close