Uncategorized

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे  झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आ.राजू खरे यांनी केली पाहणी

पापरी, येवती व देवडी या गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेती व फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

मोहोळ :-२५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे  मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून परतताच कोणताही विलंब न लावता आ. राजू खरे यांनी तात्काळ खंडाळी, पापरी, येवती व देवडी या गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेती व फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकरी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या.

दौऱ्यादरम्यान द्राक्ष, केळी, मका, डाळिंब व शेवगा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. अनेक ठिकाणी द्राक्षबागा उद्ध्वस्त झालेल्या असून केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या या संकटामुळे हिरावून गेल्याची वेदना मनाला चटका लावणारी आहे. या कठीण प्रसंगी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा त्यांनी विश्वास  दिला.

या पाहणी दौऱ्यात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश देत मदत प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असेही निर्देश दिले.

तसेच वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेत महावितरण विभागाला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचेज्येष्ठ नेते    मनोहर भाऊ डोंगरे, मोहोळचे तहसीलदार  सचिन मुळीक, तालुका कृषी अधिकारी  निगडे, महावितरणचे उपअभियंता पटवेकर साहेब, तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य  गणेश मुळे, देवडी येथील सागर थोरात (सरपंच),  धनाजी थोरात,  काकासाहेब पाटील, खंडाळी येथील श्री औदुंबर मुळे (सरपंच), श्री शंकर मामा श्रीखंडे,  समाधान माळी,  लालजी माळी,  राजाभाऊ जगताप,  हनुमंत श्रीखंडे,  संजय मुळे, पापरी येथील श्री सौदागर खडके, श्री बप्पा पाटील,  बाळू अण्णा टेकले, तसेच येवती येथील बालाजी खुर्द (सरपंच),  महादेव कवडे,  योगेश बोगाळे,  सुहास कवडे,  कुमार गोडसे,  बालाजी शिंदे,  महामुनी भाऊसाहेब (ग्रामसेवक),  शैलेश वेदपाठक,  मानाजी पाटील,  विजय खुर्द,  अतुल गोडसे,  विलास खुर्द,  दत्ता गाडे, हनुमंत खुर्द आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मानसिक धीर देत, शासन दरबारातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्याचा माझा निर्धार यावेळी पुन्हा अधोरेखित करतो.असे आश्वासन यावेळी आमदार राजू खरे यांनी दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close