Uncategorized

24 न्यूज मराठी पोर्टल संपादक युवा पत्रकार लखन साळुंखे यांना राज्यस्तरीय “आदर्श गौरव पुरस्कार २०२२ ” प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक श्रीकांत कसबे

पंढरपूर:-संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य.राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार २०२२ या पुरस्कार पंढरपूरचे युवा पत्रकार लखन साळुंखे यांन जाहीर  झाला होता .  त्याचे   वितरण शाहू स्मारक भवन ,दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले. हा  पुरस्कार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक. संसद रत्न खासदार राज्यसभा दिल्ली. आणि श्री भूषणसिंह राजे होळकरसो,  व मान्यवरांचे  हस्ते  पंढरपूरचे युवा पत्रकार लखन साळुंखे यांना  सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

आपल्या प्रिंट मीडिया न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय,आर्थिक,तसेच सर्व स्तरातील बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे. काही वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे लखन साळुंखे हे सामाजिक राजकीय याचे भान असलेले पत्रकार असून यांनी आत्तापर्यंत आपल्या लेखणी द्वारे समाजातील विविध घटकातील समस्यावर लिखाण करून न्याय देण्याचा प्रयत्न केला करत आहेत अशा तरुण पत्रकार्याच्या कार्याची दखल घेऊन या संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक  अमोल गावडे यांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.

लखन साळुंखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त  झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन श्रीकांत कसबे संपादक- सा.जोशाबा टाईम्स व वेब न्यूज पोर्टल, सुदर्शन खंदारे,नंदकुमार देशपाांडे  राहूल  सरवदे यानी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close