भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी जितेंद्र आठवले यांची निवड


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम विभाग पुनर्बांधणी करमाळा रोड कुर्डूवाडी येथे सत्यजित मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. केंद्रीय संरक्षण दल प्रमुख मीराताई आंबेडकर. राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर. प्रमुख उपस्थिती ऑड.एस के भंडारे ट्रस्टी केंद्रीय उपाध्यक्ष व आयु. रुपेश तामणगावकर पश्चिम महाराष्ट्र संघटक, आयु अण्णासाहेब वाघमारे जिल्हा अध्यक्ष पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली निवड जाहीर करण्यात आली.
तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. त्रिसरण पंचशील ग्रहण करून खालील प्रमाणे नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली सोलापूर जिल्हा अध्यक्ष पूर्व जितेंद्र आठवले. सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड. संस्कार सचिव राजेंद्र सर्व गोड. सचिव सुनील चांदणे,उपाध्यक्ष हनुमंत जगताप,,उपाध्यक्ष समाधान जाधव, संरक्षण सचिव सागर शेजाळ, उपाध्यक्ष मोहन गुडदौरु,संघटक आविकांत चंदनशिवे,संघटक विलास जगधने, संघटक अण्णाराव खंडागळे, संघटक अविनाश भालशंकर, संघटक कबीर कदम,कार्यालयान सचिव आनंद वाघमारे, कोषाध्यक्ष हनुमंत बंगाळे. इत्यादींच्या निवडी करण्यात आली. संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करण्याची अपेक्षा नूतन जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यकारणीला हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माढा करमाळा पंढरपूर माळशिरस सांगोला कुर्डूवाडी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल सर्वगोड संजय जानराव,सोमनाथ चांदणे,भास्कर जाधव,, विश्वास ताकतोडे, दत्ता भोसले गडहिरे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते



