Uncategorized

योगेश सोनलकर यांचे निधन

योगेश सोनलकर यांचे निधन .

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील योगेश अशोक सोनलकर यांचे सांगली येथे बुधवार दि.७जानेवारी रोजी दुपारी एक वाजता निधन झाले.
पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालयातील माजी प्राध्यापक अशोक सोनलकर यांचे ते सर्वात लहान चिरंजीव होते, ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेले योगेश हे सांगली येथील नामांकित कंपनीत सेवा करीत असताना अचानक छातीत दुखण्याचे सुरू झाले त्यामुळे ते घरी येऊन विश्रांती घेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने सांगली येथील घरात निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, तीन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे मोठे बंधू शैलेंद्र सोनलकर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत वरिष्ठ कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
बुधवारी रात्री उशिरा पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवार दी ९रोजी सकाळी साडे आठ वाजता तिसरा होणार आहे.
योगेश उर्फ बिना हे अत्यंत हुशार, स्वभावाने विनम्र व प्रेमळ, निष्पाप, निरागस लाघवी व्यक्तिमत्व असलेले होते, त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय सहित मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे,
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close