Uncategorized

नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे हीच माझी जबाबदारी:डॉ. प्रणिता भालके

प्रभाग 4,5,व 9 येथील कॉर्नर सभेत जाहीरनाम्यावर केली  सविस्तर चर्चा 

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-,, सत्ताधाऱ्याने भाविकांना दूषित मैला मिश्रित पाणी तीर्थ म्हणून पाजण्याचे पाप केले असल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भालके यांनी गोविंदपुरा येथील कॉर्नर सभेत व्यक्त केले.

पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4,,अ मधील उमेदवार धनंजय दशरथ कोथळकर व ब मधील उमेदवार पूनम साईनाथ अभंगराव तसेच प्रभाग क्रमांक5,ब मधील सुमित संभाजी शिंदे, प्रभाग क्र,,9,, सविता अशोक करकमकर यांच्या प्रचारार्थ सभेत व्यक्त केले.प्रभाग 4,5,व 9 येथील कॉर्नर सभेत जाहीरनाम्यावर  त्यांनी केली  सविस्तर चर्चा.
डॉ. प्रणिता  भालके म्हणाल्या की नगरपालिकेच्या इमारतीपासून कामाची सुरुवात करावी लागणार आहे कारण साध्या बेसिक गोष्टी ज्या असतात की ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात छोट्या छोट्या त्या देखील आपल्याला नगरपालिकेमार्फत  पूर्ण केल्या गेलेल्या नाहीत.आज इथं कितीतरी महिला उपस्थित आहेत मला त्यांना विचारायचं आहे की आपल्या दृष्टिकोनातून नगरपालिके अंतर्गत कुठली योजना आली आली आहे का किंवा आपल्याला कुठेतरी हाताला काम मिळावं म्हणून नगरपालिकेमार्फत काही उद्योग उभा केल्या गेला आहे का आणि कुठेतरी या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आज आपण आपल्या हक्काचा माणूस तिथे असणं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचून काम करणारा व्यक्ती तिथे असणे गरजेचे आहे आज सकाळी आम्ही जो आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो जाहीरनामा जो वचननामा सादर केला तर तुम्ही कदाचित सर्वांनी बघितलाय का ? तर तो तुम्हाला दिला जाईल तो बघा तुम्ही आणि त्यात जी वचन दिलेले आहेत आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा हा जो वचन नाम आहे यात जेवढी वचने दिली आहेत ती पूर्ण करण्याची तयारी आणि ती पूर्ण करण्याची शपथ मी तुम्हाला याच्यावरती देते.साधी बेसिक टॉयलेट वॉशरूमची सोय देखील महिलांसाठी आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही.आपण स्थानिक तर आहोत पण लाखो भाविक या पंढरपूरच्या दर्शनाला विठोबाच्या दर्शन येतात  त्यात बऱ्याच महिला देखील आहेत पण त्या इथे आल्यावर  त्या आपल्या पंढरपूरला नाव ठेवत जातात की साधी वॉशरूमची सोय देखील कुठे नाही. चंद्रभागेच्या नदीकाठाला आंघोळीला गेल्यावर चेंजिंग रूम तिथं नाहीत. कपडे बदलायला बायकांना तिथं रूम उपलब्ध  नाही. किती दुर्दैवी ही गोष्ट आहे. की साध्या बेसिक गोष्टी सुद्धा आम्हाला पुरवू शकत नसाल तर  कुठेतरी सत्ता बदलण्याची वेळ आलेली आहे आपल्याला  जर परिवर्तन घडवायचा असेल तर आपल्याला योग्य उमेदवार कामाचा माणूस तिथे पाठवण्याची गरज आहे.किती साध्या गोष्टीसाठी आपण आज आपल्या हक्कासाठी लढत आहोत काय पाहिजे आपल्याला मुक्त आज कुठल्याही परिसरात फिरा . धुळीचा एवढा मोठा साम्राज्य आहे की आज आम्ही  पंधरा दिवस पंढरपूर मध्ये फिरतोय अक्षरश्या आमच्या आवाज घशातून आवाज बाहेर निघेल एवढी धुळा माती आमच्या घशात जाऊन बसलेली आहे आणि कुठेतरी घातक आहे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज आपली छोटी छोटी पोर ज्येष्ठ नागरिक अक्षरशा धुळीने फुफुसाच्या आजार व्हायला लागलेले आहेत त्यांना पाणीपुरवठा नगरपालिके अंतर्गत होणारा बघा की अतिशय घाण दर्जाचे पाणी आपल्याला पुरवठा केला जातो आणि त्यासाठी काय करायची गरज आहे तर पाण्याची जी फिल्टरेशन क्षमता आहे ती कुठेतरी सुधारण्याची गरज आहे पाण्याचा टीडीएस वेळोवेळी चेक करण्याची गरज आहे जे पाणी आपण नगरपालिके अंतर्गत आपल्या सर्व नागरिकांना पुरवतो ते पाणी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आपण लक्ष देणे गरजेचे आहे आणि मग माझ्या माय माऊलींना माझ्या सर्व नागरिकांना पुरवणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वचननाम्यामध्ये जे दिले ते पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यासमोर उभे आहे आज धुळमुक्त पंढरपूर स्वच्छ पाण्याचे पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला करायची तर आहेत त्याचबरोबर खड्डे मुक्त पंढरपूर देखील आपल्याला करायचा आहे आज कितीतरी तरुण मुलं जे आहेत ते रस्त्यावर जाताना इतके खड्डे आहेत की त्याच्यातून पडून कितीतरी लोकांची हाड मोडलेले आहेत जेष्ठ नागरिक मगाची मागची एका सभेत मला एक काकांनी सांगितले की ताई आमचे कंबरडे मोडलेले आहेत काहीतरी याच्यावर उपाययोजना करा आणि हे रस्त्याचे सुधारणा आपल्याला करायचे असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हा सर्वांना उभे राहण्याची गरज आलेली आहे आज तरुण वर्ग कितीतरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे तरुण युवकांना कुठेतरी संधी देण्याचे भूमिका नगरपालिकेच्या मार्फत होणं गरजेचं होतं पण तीही देखील इथं झालेली नाही.आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत जाऊ त्यावेळेस इथल्या युवकांना त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल या गोष्टीचा पहिला विचार केला जाईल.  आपल्याला  त्या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे इथं आपल्या भागातून हजारोच्यावर संख्येने गोरगरिबांची पोरं यूपीएससी, एमपीएससी करायला बाहेर पुणे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी जातात आणि त्याचा जो खर्च आहे तो आपल्या खिशाला परवडणारा नाही कारण इथे बसणारा प्रत्येक माय माऊली असू द्या माझा तरुण वर्ग असू द्या तो हातावर काम करणार आहे फुलहार माळा विकणारा वर्ग आहे थोडं बांगड्या विकणाऱ्या बायका आहेत मोलमजुरीला कामाला जाणाऱ्या बायका आहेत आणि आपल्याला कुठेतरी हा खर्च जो आहे तो कशाला परवडणारा नाही आणि त्यांच्यासाठी कुठेतरी नगरपालिकेच्या अंतर्गत एखादी सुसजशी लायब्ररीचे उपलब्ध करून देण्याची गरज आहे त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या पाच वर्षात प्रयत्न करणार आहे आणि ते काम आम्ही पूर्ण करायचं वचन तुम्हाला देत आहोत या भागातील आणि नगर भागातील सगळ्या महिलांना मी ओळखते सगळ्या माझ्या परिचयाच्या आहेत सगळ्यांना हाताला काम पाहिजे आणि कामाची गरज आहे प्रत्येक माय माऊलीला त्यांनी तुमच्या दृष्टिकोनातून कुठेतरी महिलांसाठी एखादा गृह उद्योग किंवा लघुउद्योग उभारण्याची जबाबदारी माझी आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी एक महिला म्हणून तुमच्यासाठी ती करीन कारण महिलेची जी वेदना आहे ती मलाच जास्त माहिती आहे कारण मी आईच्या भूमिकेत आहे उद्या पंढरपूरचा नगराध्यक्ष म्हणून मी नगरपालिकेत ज्यावेळेस जाईन तेव्हा मी आईच्या भूमिकेत असणारे की मला सर्व नागरिक समान असणार की आईच्या पदराखाली सर्व लेकरं समान असतात तसेच सगळे लेकरं सगळी माय माऊली जनता माझ्यासाठी मी आईच्या भूमिकेत काम करणार आहे कारण या नगरपालिकेच्या आधीच्या लोकांनी बघितले इथली माझी एखादी माय माऊली एकदा कागद काढायला नगरपालिकेत गेली तर अक्षरशः दादा एलपट आपल्याला घालावे लागतात नानांच्या काळात असं होत नव्हतं नानांनी अधिकारी लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम केलेले आहेत. आजींना माहित आहे की नानांनी लोकांच्या दारापर्यंत अधिकारी नेऊन आमदार कसा असावा हे नानांनी लोकांना दाखवून दिलेला आहे आणि त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. ज्या पद्धतीने नानांच्या कामाची जी पद्धत होती तीच आपल्याला पुढे चालवायची आहे. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि पाठिंबाची गरज आहे छोटी छोटी मुलं आपल्या इथे बघायला मिळतात नगरपालिकेच्या शाळेची जी अवस्था आहे ती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली कुठल्याही आई-वडिलांना आपल्या मुलांना त्या नगरपालिकेच्या शाळेत पाठवायचं धाडस देखील होत नाही. कारण एखादी भिंत पडेल किंवा एखादा पत्रा अंगावर पडेल अशी भीती प्रत्येक माय माऊलीच्या मनामध्ये आज आहे आज डिजिटल युगामध्ये आपण वावरत आहोत. संगणक क्रांतीकडून आपली वाटचाल होत असताना आपल्या सर्वसामान्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकवत ही साधी भावना सुद्धा आपण मनात ठेवायची नाही का? ही विचार करण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मी तिथे नगराध्यक्ष म्हणून जाईल त्यावेळेस पहिल्यांदा नगरपालिकेची ज्या सर्व शाळा आहेत त्याची सुधारणा करून आपल्या सर्वसामान्यांची मुलं तिथे चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतील दिल्ली सारख्या ठिकाणी जी सोय आहे ती आपल्या पंढरपूर मध्ये का नाही व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे.आज पंढरपूरमध्ये जी तीर्थक्षेत्र आहे छोटी छोटी मंदिर आहेत, हेरिटेज प्रॉपर्टी आहेत ज्याच्या जतन कुठल्याही पद्धतीने केलं जात नाही. ते जतन करण्याची गरज आहे.एवढे मोठी चंद्रभागा नदी आहे आपल्या शेजारी किती चांगलं वातावरण आहे पण त्यात चंद्रभागे यांना नमामी चंद्रभागेला एवढा मोठा पोत्यावरच्या निधी येतो पण त्या चंद्रभागेच्या अवस्था तुम्ही जाऊन बघितली तर अतिशय घाण असा घाणीच साम्राज्य तिथे माजलेले आहे. आणि ती नदी स्वच्छ करून इथं खालच्या ठिकाणी कितीतरी बायका तिथे हार फुलं ते कुंकू हुक्का वाती घेऊन नदीला विकायला बसलेला आहे त्यांच्यासाठी कुठलीही वेगळी सोय तिथे केलेली गेली नाही. नदीचे तट सुधारले गेलेले नाहीत. आणि कुठेतरी चांगल्या दर्जाचे तट तिथे बांधून माझ्या माय माऊलींना तिथे व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तिथे चांगला माणूस जाणे गरजेचे आहे. काल आम्ही नदीपात्रात जात असताना बघितलं की अक्षरशः नमामि चंद्रभागा म्हणून तुम्ही इथं गावभर हे करता आणि त्या नदीमध्ये अक्षरशः इतकी घाण इतके देवा देवतांच्या मुर्त्या सुद्धा अशा फेकल्या गेलेल्या आहेत तिची कुठेतरी स्वच्छता केली जाणं खूप गरजेचे आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितले नदीच्या तिथं आपल्या इथं वर्ष घाट देखील आहेत की ज्या घाटावरती त्या घाटाचं चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचे काम होण्याची घाट टिकवणे गरजेचे आहे.आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हाताला समाजातील प्रत्येक घटकाला कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत काम करणार आहोत भयमुक्त खड्डे मुक्त स्वच्छ पाणीपुरवठा तर आपल्याला करायचाच आहे पण भयमुक्त पंढरपूर देखील आपल्याला करायचा आहे.आणि नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना माझे सर्वच्या सर्व माझ्यासोबत असणारे उमेदवार आणि त्यांचा एक निवडून आलेला हे शब्द माझे आहेत पक्ष पार्टी कुठलेही असे विचारात न करता सर्व लोक माझे आहेत आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे अशी भावना नेहमी दाखवलेले आहे.आणि त्यांचाच हा विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे.   मी तिथे आज नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे आणि त्यासाठी मला येणाऱ्या दोन तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंबाची गरज आहे कारण या अगोदर आदरणीय नानांना तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहण्याची त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवण्याची जी जबाबदारी पार पडलेली आहे तीच आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याची त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची गरज आहे.

आपल्या आघाडीचेच नाव तीर्थक्षेत्राचा विकास आहे आपलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला योग्य उमेदवार तिथे पाठवणे गरजेचे आहे.

मी नेहमी सांगत आले की, बलाढ्य अशा शक्तीला देखील खाली खेचण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये आहे आणि आपल्या एका मताचा अधिकार इतका प्रचंड गाजला पाहिजे इतक्या प्रचंड बहुसंख्येने आपलं मत आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना पडलं पाहिजे की आणि माझ्या ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना मी विनंती करते की दोन तारखेला रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून मला व माझ्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी द्या आमच्याकडून कधीही कामात कसूर झाली तर पुढच्या वेळेस मी मत मागायला येणार नाही हा शब्द आणि तुम्हाला विश्वास देते की काम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचून तुमच्या दारापर्यंत अधिकारी घेऊन येऊन मी काम करेन की हा विश्वास मी तुम्हाला देत असल्याचे डॉ. प्रणिता भालके यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी क्रीडा राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे. शिंदे सेना नेते साईनाथ अभंगराव भगीरथ भालके, गणेश अंकुशराव, माजी नगरसेविका मनीषा कोथळकर. माऊली काळे बापू शिंदे राहुल पुणेकर संदीप थोरात आदी मतदार महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
:

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close