येत्या 3डिसेंबरला विजय आमचाच :आ. समाधान अवताडे
भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा शहर सुधारणा विकास आघाडीची भव्य रॅली


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून छत्रपती शिवाजी चौक येथून भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा घर सुधारणा विकास आघाडीच्यावतीने भाजप व आघाडीचे नेते प्रशांतराव परिचारक मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे नगराध्यक्ष लक्ष्मणतात्या शिरसट, युवक नेते प्रणव परिचारक यांचे नेतृत्वाखाली शहरात भव्य अशा रॅलीचे नियोजन करण्यात आले

. 36 नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार शामलताई शिरसटचे यांचे सह प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते व मतदार अभूतपूर्व अशी गर्दी केली होती.
रॅलीच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात येऊन देण्यात आल्या. आमदार समाधान आवताडे म्हणाले की, आज निघालेल्या प्रचंड रॅलीकडे बघून तिथे सांगावेसे वाटते की लोक हे विकासाच्या मागे असून आमच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करतील. विधान सभेला मला मिळालेल्या लीड पेक्षा दुप्पट मताने आमच्या नगराध्यक्षाचा होणार याची आम्हाला खात्री आहे. तारखेला निश्चितच गुलाल आमचा आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून कोणती निवडणूक आम्ही लहान मोठी म्हणून बघत नाही प्रत्येक निवडणूक ही आम्ही काळजीपूर्वक लढतो प्रत्येक निवडणूक आमच्या साठी प्रतिष्ठेची निवडणूक असते. ही निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची बनवलेली आहे. पंढरपूर मंगळवेढा नगरपालिकेत निश्चितच आम्हाला विजय मिळणार आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



